मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत हे जरी तुरुंगात असले, तरी त्यांची आक्रमक शैली अद्याप कायम आहे. याची प्रचिती आज मुंबई सेशन कोर्टाबाहेर दिसून आली आहे.
शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ठाकरे गट नाराज झाले आहे. आधीच ठाकरे गटाच्या मागे एकामागोमाग एक संकटे येत असताना संजय राऊत हे तुरुंगात असल्याने शिवसैनिकांना त्यांची उणीव नक्कीच भासत आहे. पण आज न्यायालयाबाहेर त्यांनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये आनंद संचारला आहे.
आज पत्राचाळ घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई कोर्टात सुनावणी होती. त्यावेळी राऊत यांनी आपल्या नातेवाईक व शिवसैनिकांनी संवाद साधल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना बोलले, शिवसेनेचे नवे चिन्ह राज्यात नवीन क्रांती घडवून आणेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, भले नाव जरी गोठवले असले, तरी शिवसेना ही तीच आहे. तसेच, आयोगाने शिवसेना नाव गोठवले तरी शिवसेना तीच आहे, असे म्हणत शिंदे गटावर टीका केली आहे.
नेमके काय म्हणालेत संजय राऊत ?
यावेळी कोर्टाच्या अवराबाहेर संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हटले, आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट असल्याचे सांगून शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच नाव गोठवण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वी इंदिरा गांधी देखील अशाच परिस्थितीतून गेल्या होत्या. काँग्रेसचे तीन वेळा चिन्ह गोठवले होते, तर जनता दलाचेही चिन्ह गोठवले होते. पण हे बनलेच ना पुढे मोठे पक्ष, तसे आम्हीदेखील मोठे होऊ, असेही यावेळी बोलले आहेत.
नावात काय…शिवसेना नाव गोठवले तरी शिवसेना तीच आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव हे शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप व्यक्त केला जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम