Rajabhau Waje | गोडसेंवर नाराज नेत्यांचा वाजेंना पाठिंबा..?; वाजेंचे सूचक वक्तव्य..?

0
23
Lok Sabha Election Result
Lok Sabha Election Result

Rajabhau Waje |  श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्वप्रथम भाजपने त्यांना विरोध केला होता. गोडसेंनी युतीधर्म पाळला नाही. त्यांनी खासदारकीचा निधी केवळ शिवसेनेच्या आमदारांनाच दिला, असे आरोप करत स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीनेही भुजबळांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह करत गोडसेंना विरोध दर्शविला होता. त्यामुळे वरून जरी सर्व गोजिरे वाटत असले तरी, गोडसेंवर महायुतीत अंतर्गत नाराजीचेच वातावरण आहे. (Rajabhau Waje)

दरम्यान, काल महायुतीने नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्श केले. यावेळी हेमंत गोडसे (Hemant Godse) यंदा देखील निवडून येतील आणि हॅट्रिक करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. तर, आम्ही पूर्ण ताकद लावून गोडसेंना निवडूनच आणू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) म्हणाले की, “मला हेमंत गोडसेंचं मला अजिबात आव्हान वाटत नाही, कारण शंभर टक्के माझाच विजय होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यामागे काही पडद्यामागील राजकीय हालचाली आहेत का..? यावर वाजे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Rajabhau Waje | नाशिक, दिंडोरीत आज महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Rajabhau Waje | गोडसेंचं आव्हान वाटतच नाही

“मला प्रतिस्पर्धी हेमंत गोडसेंचं अजिबात आव्हान वाटतच नाही. गेल्या ३७ दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात मी फिरतोय आणि मला वातावरण अनुकूल वाटत आहे. कोणतीही निवडणूक ही सोपी कधीही नसते. लढत होणार आहे. माझं प्रामाणिक मत आहे की, 100 टक्के विजय हादेखील माझाच होणार आहे, असा विश्वास राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला आहे. (Rajabhau Waje)

राजाभाऊ वाजेंचं सूचक वक्तव्य

दरम्यान, यावेळी वाजे यांना हेमंत गोडसेंवर नाराज असलेले महायुतीचे नेते तुम्हाला मदत करणार आहे का? असा प्रश केला असता, “राजकारणात सर्व गोष्टी अशा उघड करून बोलता येत नाही” असं सूचक वक्तव्य अवजे यांनी केलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Hemant Godse | मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि कर्ज ; बघा गोडसेंची संपत्ती किती..?

नाशिकमध्ये दहा वर्षात काही काम झाले नाही

महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aghadi) मतदार संघात अगदी सकारात्मक वातावरण आहे. मी सिन्नरचा आमदार असताना प्रामाणिकपणे कामे केली असून, मी माझ्या पक्षाशी शिवसेनेशी (Shiv Sena) निष्ठावान आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात काहीही काम झालेले नाही, असे मतदार आम्हाला सांगतात. मी समाजोपयोगी काम करणार आहे. माझ्यावर टीका करायला जागा नसल्याने मी ग्रामीण भागातला असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र मी एका कॉन्व्हेंट शाळेत शिकलो आहे, असेही वाजे यावेळी म्हणाले.(Rajabhau Waje)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here