Onion Issue | कांदा निर्यात बंदी संदर्भात धोरण तात्काळ मागे घ्या; आ. डॉ. राहुल आहेर यांची मागणी

0
27

Onion Issue | सोमनाथ जगताप : केंद्र शासनाने घेतलेल्या कांदा निर्यात बंदी संदर्भात लागू करण्यात आलेले धोरण तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आज शुक्रवारी (दि. ८) रोजी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Nashik | नाशिकमधील रेशन दुकाने 3 दिवस बंद..!

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केल्याने तालुक्यात संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. याची दखल घेऊन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कैफियत मांडली.

Deola | शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग अडवून केलं रास्ता रोको आंदोलन

चांदवड-देवळा मतदार संघात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. चालू वर्षी पुरेसा पाऊस पडला नसला तरी शेतक-यांनी पाण्याचे विकत ट्रॅकर मागवून कांद्याला पाणी पुरवले असून मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाले आहे. परंतु कांद्याचे दर नियंत्रणात आणण्याकरीता शुक्रवारी (दि. ८) रोजी कांदा निर्यात बंदी संदर्भात केंद्र सरकारने निर्यात बंदीचे परिपत्रक काढून आज सर्वच बाजार समिती मध्ये कांद्याचा भाव अचानक कमी झाल्याने नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात तसेच राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन सुरू करून सरकार विरुद्ध रोष व्यक्त केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here