पुणे – काल संपूर्ण राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा पार पडला असताना तिकडे पुण्यातील मिरवणुका मात्र गेल्या २४ तासांहून अधिक तासांपासून सुरु आहे. यामुळे यंदा पुण्याच्या मिरवणुकीत एक नवा विक्रम प्रस्थापित होणार आहे.
काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी १० वाजता पुण्यात मिरवणुकीचा नारळ फोडण्यात आला होता. मात्र आज २८ तास उटलून गेले तरीदेखील मिरवणुका अद्यापही सुरुच आहे. लक्ष्मी रोडसह केळकर रोड, शास्त्री रोड येथेही मंडळांच्या रांगा आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनपर्यंत अलका टॉकीज चौकातून २०६ गणेश मंडळे पुढे सरकली होती. पण ही संपूर्ण परिस्थिती पाहता मिरवणूक संपण्यास संध्याकाळ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
काल मानाच्या गणपतींच्या विसर्जनानंतर आज सकाळी दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन करण्यात आले, त्यानंतर इतर मंडळांचे विसर्जन पार पडत आहे. दरम्यान, विसर्जनातील सहभागी मंडळांच्या ह्या विलंबामुळे पोलिसांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम