कोणीतरी स्पीकरवरून दोन गाणी वाजवा म्हटले, आणि पोलीस आयुक्त खवळले !

0
40

पुणे – इथे आधीच मिरवणूक खोळंबली, त्यात तरुणांचा धिंगाणा, त्यामुळे मिरवणुकीत होत असलेला वेळ पाहता पोलीस आयुक्तांनी रात्री बारा वाजता डीजेसह सर्व साऊंड सिस्टिमवर बंदी आणली होती. मात्र, मिरवणूक चालूच होत्या. त्यात एका मंडळाची रथ आली आणि मंडळाच्या एकाने गाणी वाजवण्याचे सांगितले. त्यावर मात्र, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता चांगलेच खवळले. नेमका काय घडले त्यावेळी !

पुण्यासह राज्यात तब्बल दोन वर्षांनी गणेशोत्सव पार पडला. त्यामुळे पुण्यात यंदा गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला उशीर झाला होता. तब्बल १० तास चाललेल्या मानाच्या गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणूकीनंतर देखील काही मंडळे हे लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोडवर थांबली होती, त्यामुळे पोलीस आयुक्त नाराज होते.

माजी नगरसेवक दीपक पोटे यांचा अचानक मित्र मंडळाचा गणपती हा तब्बल तासभर कुमठेकर रोडवरच थांबला होता, त्यामुळे इतर मंडळांच्या मिरवणुकीत उशीर होत होता. त्यातच त्यांच्या एका कार्यकर्त्याने डीजेवर दोन गाणी वाजवण्याचे आदेश दिले आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा पार चढला. अखेर ते स्वतः पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन डीजे बंद करण्याचे आदेश दिले व दीपक पोटे यांच्या मंडळाला पुढे जाण्याच्या सूचना दिल्या. यामुळे मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली.

दरम्यान, सोशल मिडीयावर हा व्हिडीयो जोरदार व्हायरल झाला आहे. मात्र यंदा पुण्यातली मिरवणूक तब्बल २८ तास चालल्यामुळे पोलीस प्रशासन व पुणेकरांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here