द पॉईंट नाऊ: ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीनिमित्त आज (दि. ९) दुपारी तीन वाजता चौकमंडई येथून शहरातील मुस्लिम बांधवांचे सर्वोच्च धर्मगुरु तथा खतीबे शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली जुलूस-ए- ईद-ए-मिलादुन्नबीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे व मिरवणुकीत डीजेचा वापर करू नये, असे आवाहन सुखी मरकजी सिरत कमिटीतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान जयंतीनिमित्त मुस्लिम मोहल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
ईद-ए-मिलादुनबीच्या पूर्वसंध्येस काल (दि.८) रात्री दूधबाजारातील लबाडी दरुनीपुरा मशिदीत रात्रभर शबे बेदारीचा कार्यक्रम झाला. यावेळी मशिदीचे मुख्य इमाम मौलाना शमशुद्दीन खान मिसवाही यांचे प्रवचन झाले. तसेच सवा लाख पवित्र दरूद शरीफचे पठण करण्यात आले, अशी माहिती मशिदीचे मोअज्जीन हाजी जाकीर अन्सारी यांनी दिली आहे. याशिवाय शहरातील अनेक मशिदींमध्ये पैगंबराच्या मिलादनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..
दरम्यान, मिरवणुकीत सामील होताना सर्व मुस्लिम बांधवांनी डोक्यावर इस्लामी पद्धतीने टोपी घालावी, केवळ धार्मिक घोषणा देण्यात याव्यात मंडळांमध्ये जास्त अंतर ठेवू नये, पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, गुलाबपाणी फवारताना कोणालाही बस होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच मिरवणुकीत सामील होताना डीजेचा वापर करू नये, अशा सूचना जुलूस कमिटीतर्फे देण्यात आल्या आहेत. ईद-ए-मिलादनिमित्त आज (दि.९) दुपारी साडेअकरा वाजता बागवानपुरा चौकात सर्व धर्मीयांसाठी अवदानाचा कार्यक्रम होणार आहे. मिरवणुकीनंतर बडी दर्गाह येथेही अवदानाचा कार्यक्रम होईल. दरम्यान मिरवणूक मार्गावर तसेच शहरातील इतर मुस्लिम वस्त्यांमध्ये यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणावर सजावट करून ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच अनेक चौकांमध्ये स्वागत कमानी उभारून तेथे विविध दम्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहेत. दरम्यान मिरवणूक मार्गावर तसेच संपूर्ण भद्रकाली व मुंबई नाका पोलीस ठाणे सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याचे वारस निरीक्षक दत्ता पवार व मुंबई नाका पोलीस ठाण्याचे व निरीक्षक सुनील रोहकले यांनी दिली.
असा असणार आहे मिरवणुकीचा मार्ग
चौकमंडई येथून मिरवणुकीची सुरुवात होऊन बागवानपुरा, कपडा, शिवाजी चौक, मौरा दातार दर्गाह भोईगल्ली, आजाद चौक, पठाणपुरा, चव्हाटा, नाईकवाडीपुरा, बुधवार पेठ, सुभाष वाचनालय, आदम शाह, काजीपुरा, बुरुड गी कोकणीपुरा, फुले मार्केट, खडकाळी, त्र्यंबक दरवाजा, शहीद अब्दुल हमीद चौक, दूध बाजार, पिंजार घाटमार्गे जाऊन यही दर्गाह येथे सांगता होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम