Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांची जे.पी गावितांसाठी मोठी ऑफर; गावित काय निर्णय घेणार..?

0
48
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar | नाशिक :  राज्यभरात महायुती सरकारची लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही चर्चेचा विषय ठरत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या योजनेची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे सत्ताधाऱ्यांकडून कौतुकीची तर विरोधकांकडून टिकेची धनी ठरणाऱ्या या योजनेवरून आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सरकारला धारेवर धरत आरोप केले आहे.

आज प्रकाश आंबेडकर हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी माजी आमदार जे.पी गावित (J P Gavit) यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. पेसा भरती व्हावी, या मागणीसाठी आदिवासी विकास भवन कार्यालयात मागील चार दिवसांपासून गावित यांचे आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू आहे.

Prakash Ambedkar | ओबीसीत मराठ्यांचा समावेश होऊ शकत नाही; सगेसोयऱ्यांच्या मागणीलाही विरोध

Prakash Ambedkar | आंबेडकरांकडून गावीत यांना मोठी ऑफर

माकपचे माजी आमदार जे.पी गावीत यांनी आमच्याबरोबर तिसऱ्या आघडीत येण्याची ऑफरही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जे पी गावित यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, माकपने काँग्रेससोबत लग्न केले आहे. त्यांचा काडीमोड झाल्यानंतर काय ते बघू, अशी बोचरी टिकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, आंबेडकरांच्या ऑफरचा जे.पी गावित स्वीकार करणार का..? गावित काय निर्णय घेणार? हे पहावे लागणार आहे.

Prakash Ambedkar | जरांगे लोकसभेच्या रिंगणात उतरणार; आंबडेकरांसोबत नवी आघाडी

आदिवासींच्या बजेटमधील पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले का?

या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आदिवासी हे 7.5 टक्के असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दहा हजार कोटीचे बजेट तयार केले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने राज्य सरकारला अदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणीवच नाही. बोगस आदिवासी भरती असल्याचे सांगत जे बोगस होते त्यांचा खुल्या प्रवर्गात समावेश केला. पण आदिवासी पेसाअंतर्गत कुठलीही भरती करण्यात आली नाही.(Prakash Ambedkar)

नाशिकचे आदिवासी आयुक्तालय हे आंदोलनासाठी लक्ष करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कार्यालय लक्ष करा, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर निशाणा साधत ये योजनेसाठी पैसा कुठून आला? आदिवासी समाजाच्या बजेटमधील 7 हजार कोटी हे लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले का? असा सवाल उपस्थित करत जर असे केलेले नाही तर सरकारने आदिवासींच्या बजेटचे विवरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here