MNS Politics | राज ठाकरेंकडून इव्हीएम वर संशय व्यक्त; चिंतन बैठकीत आगामी निवडणुकीबाबत मोठा निर्णय!

0
39
#image_title

MNS Politics | विधानसभा निवडणुकीत मनसेना पराभवाचा सामना करावा लागला असून पक्षाध्यक्ष राज ठाकरे आता अलर्ट झाले आहेत. राज ठाकरे यांनी मुंबई येथील उमेदवारांसोबत काल चिंतन बैठक घेतल्यानंतर आज ते पुण्यात दाखल झाले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई वकळता राज्याच्या अन्य भागांमधील पराभूत उमेदवारांसोबत चर्चा केली असून पुण्यातील या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी ईव्हीएम संशय व्यक्त केल्याची माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.

MNS Candidate | मनसेचे दोन उमदेवार जाहीर; राज ठाकरेंकडून निष्ठावंतांना ‘निष्ठेचे फळ’

काय घडलं मनसेच्या बैठकीत? 

राज ठाकरे यांनी राज्यभरात झालेल्या निवडणुकीचा आढावा घेतला असून ईव्हीएम संदर्भात पुरावे गोळा करण्याचे आदेश या बैठकीत दिले आहेत. दरम्यान, उमेदवारांनी त्यांना आलेले सर्व अनुभव राज ठाकरे यांना सांगितल्याची माहिती आहे. “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नागरिकांमध्ये उत्साहन दिसत नसल्याचे चित्र आहे. इव्हीएम विरोधात सगळ्यात आधी आम्ही पुढे आलो होतो. आमचे उमेदवार जसे पुरावे देतील. त्यानंतर निर्णय होईल. पुढे काय करायचं तूर्तास ईव्हीएम विरोधात कोणती भूमिका नाही.” असे मनसेने ते बाबू वागस्कर यांनी सांगितले असून येणाऱ्या सर्व निवडणुका मनसे जोमाने लढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर मनसेने तातडीने बैठक घेतली असून या बैठकीत पक्षाने महायुतीत सहभागी व्हावे. असा प्रस्ताव मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आला होता. अशी माहिती देखील पक्षात च्याच एका नेत्याने दिली आहे.

Shivsena UBT MNS Clash | ‘उठ दुपारी घे सुपारी’; मनसे-ठाकरे गटाचा राडा

मनसे समोर पक्षाचे चिन्ह वाचवण्याचे आव्हान

या विधानसभा निवडणुकीमध्ये तात्कालीन आमदार राजू पाटील यांच्यासह बळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव असे मनसेचे मोठे नेते देखील पायघशी पडले असून पुत्र अमित ठाकरे यांच्या पराभवाचा राज ठाकरेंना सर्वात मोठा फटका बसला आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना त्यांना होम ग्राउंड माहीय विधानसभा मतदारसंघातच पराभवास सामोरे जावे लागले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला एकही जागा जिंकता आली नसून पक्षाला एकूण मतांच्या 1.8 टक्केच मते मिळाल्यामुळे पक्षासमोर चिन्ह वाचवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख नेते, पदाधिकारी, सरचिटणीस यांची शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here