MVA Political | विधानसभेतील पराभवानंतर ‘मविआ’ फुटणार?; महापालिकेच्या निवडणुकांबाबत राऊतांच्या विधानानं वेधलं लक्षं

0
31
#image_title

MVA Political | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. आघाडीतील तीनही पक्षांना याचा मोठा धक्का बसला असून या पराभवाची कारणमीमांसा महाविकास आघाडीचे नेते आणि घटक पक्षांकडून केली जात आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या विजयी व पराभूत उमेदवारांच्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा सूर उमटला असून त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी फुटणार असल्याचा चर्चा होऊ लागल्या आहेत. अशातच संजय राऊत यांनी केलेल्या विधानानं लक्ष वेधले आहे.

Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीची गॅरंटी; महिलांना दरमहा 3000 रुपये देणार! 

काय म्हणाले संजय राऊत? 

आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटात स्वतंत्रपणे लढण्याबाबत झालेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी, “या बातम्या निराधार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो होतो. त्यावेळी आम्हाला चांगले यश मिळाले होते. 30 पेक्षा अधिक जागा जिंकणे ही मोठी गोष्ट होती. आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे असे कुणाचाच म्हणणे नव्हते. विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर जर कोणी असे म्हणत असेल, तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते. जे उमेदवार पराभूत झाले आहेत. ते ‘आपल्याला काही फायदा झाला नाही’ असं म्हणू शकतात.” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Mahavikas Aaghadi | मविआतील नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

आगामी निवडणुका मुंबई महानगरपालिकेचे मोठे आव्हान असणार!

तसेच आगामी महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार का? असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी, “या निवडणुकांना वेळ आहे. तेव्हा विचार करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व विधानसभा लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात.” असे म्हटले आहे. तसेच या निवडणुकीत ज्याप्रकारे, ईव्हीएमचा घोटाळा समोर आला आहे, पैशांचा वापर झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची अवस्था वाईट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या पक्षांना त्याचा फटका बसला आहे. आम्हाला देखील याचा फटका बसला असून आम्ही तिघांनीही एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे. आता आमच्या समोर मुंबई महानगरपालिका व राज्यातील पुणे नाशिक सारख्या 14 महानगरपालिका आव्हान आहे. त्यातही मुंबई महानगरपालिका हे मोठे आव्हान असणार आहे. आम्ही त्याबाबत विचार करत आहोत.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here