Political News | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रीपद कोणाला जाणार याबाबत चर्चा सुरू असून मुख्यमंत्री पदाचा पेच सुटल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्रीपद हे भाजपला जाणार असल्याच्या चर्चा असून त्यामुळे आता एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.
Political News | विधानसभेला शिंदेंच्या विरोधात लढलेला उमेदवार करणार शिंदेसेनेत प्रवेश!
नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता
राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने एकनाथ शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देखील आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. दरम्यान, राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत.
नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसेनेच्या नेत्यांची, आमदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तर जास्त मताधिक्य असल्याने मुख्यमंत्री भाजपचेच होणार हे निश्चित असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा देखील सुरू झाली होती. ज्यामुळे शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासी स्थानी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
Political News | निकालापूर्वी ठाकरेंचा भाजपला दणका!; महत्त्वाच्या नेत्याने हाती घेतली मशाल
नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली व आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमून मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी मनापासून ऋणी आहे. परंतु अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये. असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती आहे की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ व समृद्ध महाराष्ट्राकरिता महायुती भक्कम होत आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.” असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम