कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे माझी जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे हे पक्ष बदल करण्याच्या तयारीत असल्याची खबर लागली होती. त्यांनी आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवत पक्ष सोडून जाण्याचा निर्णय अप्रत्यक्षपणे जाहीर केल्याचे चित्र आहे.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या ए. वाय. पाटलांचे मेहुणे के. पी. पाटील यांनी देखील आता महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत देण्यास सुरुवात केली आहे की काय अशा चर्चांना उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे महायुतीने आयोजित केलेल्या लाडकी बहीण सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमास के. पी. पाटलांनी देखील अनुपस्थिती दर्शवली.
अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर ए. वाय. पाटील आणि के. वाय. पाटील या दोघांनी देखील अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु “ज्याचा आमदार त्याचा मतदारसंघ” हे सूत्र महायुती सरकार मध्ये लागू झाले आणि त्यानंतर मात्र दोघांनीही अजित पवार गटापासून अलिप्त राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या पक्षाच्या जिल्हा मेळाव्यालाही ते अनुपस्थित दिसले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यावर मात्र त्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.
महायुतीने फुंकले विधानसभेचे रणशिंग
महायुतीकडून तपोवन मैदानावर आज विधानसभेच्या दृष्टिकोनातून पहिले व मोठे पाऊल उचलण्यात आले. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण सन्मान या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला घाटगें सोबतच के. पी. पाटलांनी लावलेला अनुपस्थितीमुळे घाटगेंबरोबर के. पी. पाटील देखील हाती तुतारी घेता येत की काय अशा चर्चांना उधाण आले आहे.
समरजीतसिंह घाटगेंकडून अप्रत्यक्षपणे पक्ष सोडण्याचे संकेत
महायुतीच्या लाडकी बहीण सन्मान कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवण्याबरोबरच घाटगे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून भाजपाचे ‘कमळ’ हटवून “लढा शाहूंचा लढा सर्वसामान्यांचा” असा स्टेटस ठेवत, त्यावर आपल्या वडिलांचा म्हणजेच माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांचा फोटो ठेवला. यामुळे समरजीत घाटगे भाजपला रामराम ठोकणार असे संकेत हळूहळू अधिक बळावत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम