Skip to content

पुण्याजवळ निगडीत दोन हॉटेलवर पोलिसांचा छापा, पाच तरुणींची केली सुटका


पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथे दोन हॉटेलवर पोलिसांनी छापेमारी करत देहविक्री व्यवसाय कररवून घेणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ तरुणींची सुटका करण्यात अली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून एकाची शोध सुरू आहे.

दीपेन दिनेश शेट्टी, विवेक नोबराज विश्वकर्मा आणि प्रदीप माधवा पुजारी, असे अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत. आणखी एक आरोपी शशांक शेट्टीचा पोलीस शोध घेत आहे .

निगडी परिसरात अवैधरित्या देहविक्री व्यवसाय सुरू असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी परिसरातील दोन लॉजवर छापा टाकला. त्या छाप्यात पाच तरुणींची सुटका केली. तसेच हॉटेल मॅनेजरसह स्टाफ कर्मचाऱ्यांना निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

देहविक्री करणाऱ्या ५ तरुणींची यातून सुटका करण्यात आली आहे. त्यांना बळजबरीने देहविक्री व्यवसायामध्ये ढकलून देण्यात आलं होतं. या प्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करत आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!