Deola | खर्डे येथे आरोग्य अधिकाऱ्याच्या घरात निघाला विषारी साप

0
31

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |   देवळा तालुक्यातील खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात बुधवार (दि. ८) रोजी विषारी साप निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

देवळा तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या खर्डे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात डॉ. जितेंद्र पवार हे सहकुटुंब राहत असून त्यांच्या निवासस्थानातील स्वयंपाकघरात डॉ. पवार यांच्या पत्नीला दरवाजाजवळ सांप  दिसताच त्यांनी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.

Maharashtra politics | आज कळणार की, घडयाळ नेमके कोणाचे..?

दरम्यान, कर्मचारी लागलीच धावून आल्याने त्यांनी हा साप शिताफीने मारला. हा साप अत्यंत विषारी अशा मणियार जातीचा असल्याचे सांगितले जात  आहे. याप्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या आजूबाजूला गवताचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सहाजिकच अशाप्रकारच्या घटना पुढेही घडू शकतात.

तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही खूप जुनी झाली असून, तिचे निर्लेखन देखील झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची देखील दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कर्मचारी निवासस्थानात राहतच नाही. पावसाळ्यात आरोग्य केंद्राची इमारत गळते.

Nashik News | सिविल हॉस्पिटलचा अजब कारभार; जिवंत महिलेस केलं मृत घोषित

याची मध्यंतरी तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. आरोग्य केंद्राच्या नवीन प्रस्तावित इमारतीसाठी जिल्हा परिषदने निधी मंजूर केला असून, ह्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी सरपंच जिभाऊ मोहन, उपसरपंच सुनील जाधव यांनी केली आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here