PM Narendra Modi | मोदींची पिंपळगावमध्ये सभा; भुजबळांची मोठी माहिती

0
31
PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi | दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली असून, यावेळी मध्यमांसोबत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठी माहिती दिली. छगन भुजबळ म्हणाले की,”नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही पूर्ण ताकदिने उतरणार आहोत. दोन तारखेला भारती पवार या अर्ज दाखल करणार असून, त्यासाठी आम्ही मिरवणुकीने जाणार आहोत. तसेच त्याच्याआधीच नाशिकच्या उमेदवाराचीही घोषणा होईल.(PM Narendra Modi)

येत्या 10 मे ला पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) नाशिकच्या पिंपळगाव येथे जाहीर सभा होणार असल्याची माहितीही मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावेळी दिली. आज नाशिकमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ फार्म येथे छगन भुजबळांची भेट घेतली. यावेळी दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार (Bharti Pawar), नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव (Prashant Jadhav), माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) हे उपस्थित होते.

PM Narendra Modi | नाशिकमधून पंतप्रधान मोदी महायुतीचे उमेदवार..?

नाशिक-दिंडोरीत आम्ही पूर्ण ताकतीने उतरणार  

दरम्यान, यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, “नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही सगळे पूर्ण ताकदीने उतरणार असून, येत्या दोन तारखेला भारती पवार यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही मिरवणुकीने जाणार आहोत. तसेच तोपर्यंत नाशिकच्या जागेवरील उमेदवारही कदाचित 1-2 दिवसांमध्ये जाहीर होईलच. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत. तसेच 10 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचीदेखील पिंपळगावला जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (PM Narendra Modi)

Nashik Lok Sabha | संकटमोचकांची गुप्त खलबतं; तर, भुजबळ फार्मवरही मोठ्या हालचाली

PM Narendra Modi | दोन तारखेला भारती पवार अर्ज दाखल करणार 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यावेळी म्हणाल्या की, “छगन भुजबळ हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आहेत. याआधी देखील त्यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भेट घेतली होती. विकासाकामांसाठी त्यांनी नेहमीच आम्हाला दिशा दाखवलीय आणि मार्गदर्शनही केलंय. दोन मे ला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. यावेळी भुजबळांनी लोकांना भेटा, आणि कांदा प्रश्नांबाबत लोकांना आपण काय काय कामं केलीय ते सांगा, अशा सूचना केल्याचे भारती पवारांनी यावेळी सांगितले. (PM Narendra Modi)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here