Agriculture | हिवाळ्यात करा ह्या भाज्यांची लागवड; आणि मिळवा भरघोस उत्पन्न

0
16

Agriculture | सध्या देशासह राज्यात थंडीला सुरुवात झाली आहे. अनेक भागात थंडी वाढत आहे. या काळात हिरव्या भाज्यांचे भरघोस उत्पादन मिळते. या काळात बाजारात भाज्यांची मागणीही वाढलेली असते. ह्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोमॅटो, वांगी, मुळा यांची लागवड करावी. या पिकांतून काही महिन्यांतच भरघोस उत्पादन मिळते. फक्त यासाठी त्यांना या हिरव्या भाज्यांचे खास प्रकार निवडावे लागतील. तसेच चांगले पिक येण्यासाठी योग्य वेळी पाणीही द्यावे लागेल.

भाज्यांच्या मागणीत वाढ

हिवाळ्याचा हंगाम हा विशेषतः हिरव्या भाज्यांसाठी ओळखला जातो. आणि विशेष म्हणजे हिवाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांची चवही वेगळी असते. त्यामुळेच जसा हिवाळा वाढतो तसं हिवाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या हंगामी भाज्यांची बाजारात मागणीही वाढते. आता नोव्हेंबर महिन्यात हंगामी हिरव्या भाज्यांची लागवड केली. तर, जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये त्याची विक्री करुन चांगले उत्पन्न मिळू शकते.

Crime News | आईचा डोळा लागला आणि १० महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू

टोमॅटोची लागवड

हिरव्या भाज्यांचे अनेक प्रकार आले आहेत की, ज्यांना पेरणी झाल्यावर झाडांना वेळेपूर्वीच फुले व फळे येऊ लागतात. टोमॅटो ही एक अशी भाजी आहे, की ज्याच्याशिवाय आपण चवदार भाजीची कल्पनाच करु शकत नाही. वर्षभर बाजारात टोमॅटोला मागणी असते. बरेच लोक टोमॅटोचा वापर सॅलेड व चटणीसाठी करतात.

अर्का विकास, ५-१८ स्मिथ, सर्वोदय, निवड-४, समय किंग, अंकुश, टोमॅटो १०८, विक्रंक, विशाल, विपुलन व अदिती यासह टोमॅटोच्या अनेक जाती आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकाराची निवड करू शकतात आणि टोमॅटोची रोपे लावताना, एका ओळीपासून दुसऱ्या ओळीपर्यंतचे अंतर ६० सेंटीमीटर असले की, झाडांची वाढ झपाट्याने होते.

४० ते ५० दिवसांत मुळा तयार होतो 

नोव्हेंबर महिन्यात मुळा पिकाची लागवड केली जाते. मुळा पिकासाठी हिवाळा ऋतू हा चांगला असतो. हिवाळ्याच्या काळात मुळयाच्या झाडांची वाढ लवकर होते. वालुकामय चिकणमाती ही मुळा लागवडीसाठी उत्तम असते. वालुकामय चिकणमातीच्या जमिनीत मुळा पेरल्यास पिकाचे चांगले उत्पादन मिळते.

जपानी व्हाईट, पुसा चेतकी, पुसा देसी, अर्का निशांत, बॉम्बे रेड, पुसा रेशमी, जौनपुरी, पंजाब एजेटी व पंजाब व्हाईट या मुळ्याच्या सुधारित जाती आहे. यापैकी कोणत्याही जातीची पेरणी करू शकतात. मुळा पीक हे ४० ते ५० दिवसांत तयार होते. जर तुम्ही एक हेक्टरमध्ये याची लागवड केली तर, तुम्ही २५० क्विंटलपर्यंत मुळा विकू शकता, ज्यातून लाखो रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळते.

IOCL Recruitment | इंडियन ऑइलमध्ये १,७६० जागांसाठी बंपर भरती

 हिवाळ्यात करा वांग्याची लागवड 

नोव्हेंबर महिन्यात वांग्याची लागवड करणेदेखील फयदेशीर असते. वालुकामय चिकणमाती वांग्याच्या लागवडीसाठी उत्तम माती आहे. पुसा पर्पल क्लॉन्ग, पूजा क्रांती, पुसा पर्पल क्लस्टर, पुसा पर्पल क्लस्टर, पुसा अनमोल, अन्नामलाई, मुक्तकेशी व बनारस जेट ह्या वांग्याच्या सुधारित जाती आहे. जर तुम्ही आता वांग्याची लागवड केली तर ६० ते ७० दिवसांत उत्पादन सुरू होईल. एक एकरात वांग्याची लागवड केल्यास १२० क्विंटलपर्यंत भरघोस उत्पादन मिळते.

Gram Panchayat Elections Result | ठरलं तर मग..! बघा जिल्ह्यात कुठे कोणाचा गुलाल


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here