Deola| देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवार…

0
49

Deola| देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ह्या पदासाठी सोमवार (दि. ३०) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता.  दरम्यान, नगरसेविका भाग्यश्री अतुल पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्याकडे दाखल झाला आहे. त्यामुळे आता त्यांची देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाल्यातच जमा आहे.

निवड घोषित होण्याची फक्त औपचारिकताच बाकी उरली आहे. नगराध्यक्ष पदाच्या एकमेव उमेदवार भाग्यश्री पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हानेते केदा आहेर, गटनेते संभाजी आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, अशोक आहेर, मनोज आहेर, कैलास पवार, बाजार समिती संचालक भाऊसाहेब पगार आदी मान्यवर उपस्थित होते. देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागांसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी निवडणूक घेण्याबद्दल अधिसूचना जाहीर केली होती.

देवळा | उमराणे येथे साखळी उपोषणाला भाजपचे जिल्हा नेते केदा आहेरांनी दिली भेट
नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सुलभा जितेंद्र आहेर यांनी आवर्तन पद्धतीने २० ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिला होता. तर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांनीही  १८ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला होता. या दोन्ही रिक्त पदांसाठी जिल्हाधिकारी जाळाज शर्मा यांनी निवडणूक घोषित केला असून, नगराध्यक्ष पदासाठी ३० ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. १नोव्हेंबर रोजी छाननी आणि वैध उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, २ नोव्हेंबर रोजी माघार आणि ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे.
नगराध्यक्ष ह्या पदासाठी भाजपचे तालुकाअध्यक्ष तसेच माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री अतुल पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

आता राजकारण्यांना मंदिरातही प्रवेश बंदी; मराठा आरक्षणासाठी असा निर्णय घेणारे पहिलंच मंदिर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here