nashik onion prices | यंदा शेतकऱ्यांसाठी कांदा व टोमॅटो ही दोन्ही पीकं बेभरवशाचे ठरलेले आहे. दरम्यान, काही दिवसांपासून कांद्याला चांगला दर मिळत होता तर त्यात सरकारने निर्यात धोरणात बदल केला. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल एका मेसेजचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढत होते.
अनेक ठिकाणी ७० ते ८० रुपये किलो ह्या दराने कांदा काही दिवसांपासून विकला जात आहे. दरम्यान, चाळीत साठवलेला कांदाही संपत आला असून, तसेच कांदा काढणीला उशीर झाल्यामुळे दरांत वाढ झाली होती. याकाळात कांद्याची किरकोळ बाजारात किंमत १०० रुपयांवर जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती.
दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे दर वाढल्यामुळे केंद्र सरकारने निर्यात धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन केले आहे. त्यामुळे कांदाच्या दरात घसरण सुरु झाली. त्यातच नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती दिवाळीनिमित्त ९ ते १८ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अचानक आवक वाढून कांद्याचे दर घसरले आहेत.
Nashik News | नाशिककरांवर ओढावणार पाणीकपातीचं संकट…
एका मेसेजचा परिणाम
पुढील आठवड्यापासून लासलगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समिती बंद राहणार आहे. दिवाळीमुळे ९ ते १८ नोव्हेंबरपर्यंत बाजार समिती बंद राहणार असल्याचा हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि त्यामुळे सर्वच बाजार समितीमध्ये अचानक कांद्याची आवक वाढली.
आणि त्याचवेळी कांद्याचे दर वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० डॉलर प्रति टन केले आहे. त्याचा मोठा परिणाम कांद्याच्या दरांच्या घसरणीवर झाला. केंद्र सरकारने लावलेल्या ह्या निर्यात शुल्काला शेतकरी, शेतकरी संघटना तसेच कांदा उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
कांदा प्रश्ना बाबत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता, मंत्री महोदयांशी संपर्क झाला नाही. ते सध्या चंदीगड येथे असल्याची माहिती त्यांच्या स्वियसह्याक यांनी दिली आहे. यामुळे कांदा प्रश्नावर मंत्री पवार आता तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार की शेतकऱ्यांना आश्वासन देत वाऱ्यावर सोडणार हे येणाऱ्या काळात दिसेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम