Onion | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सध्या विक्रीसाठी कांदा आहे त्यांना याचा फायदा होतो आहे. दरम्यान सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदाच शिल्लक राहीलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कारण ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा होता, त्यावेळी कांद्याला भाव नव्हता. आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसताना कांद्याच्या दराला झळाळी आलेली आहे.
दर आहे पण कांदा नाही…
कांद्याच्या दराच्या बाबतीत सध्या शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती आहे. कांद्याचे भाव वाढले पण कांदा शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना दुःख आहे. दरम्यान, कांद्याला सरासरी 4 हजार 800 ते जास्तीत जास्त 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो आहे. कांद्याला चांगला दर मिळत असताना शेतकऱ्यांकडे मात्र विक्रीसाठी कांदाच शिल्लक नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे फारसा कांदा शिल्लक राहिलेला नसताना कांद्याचे भाव आता चांगलेच वधारु लागलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 4 हजार 800 रुपये तर जास्तीत जास्त 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागलेला आहे..
NMC Election | आधी लोकसभा; त्यानंतरच होणार महापालिका निवडणुका
शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ची स्थिती
भाव वाढतील अशा आशेत शेतकऱ्यांचा बहुतांश कांदा यापूर्वीच विकला गेलेला आहे. तर ठेवलेला काही कांदा सडल्यामुळे शेतकऱ्यांकडे फारच कमी कांदा शिल्लक राहिलेला आहे. भाव वाढल्याचा आनंद एका बाजूला, तर दुसरीकडे कांदा शिल्लक राहिला नसल्याचं दुःख शेतकऱ्यांना असल्यानं शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ची स्थिती आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव वाढण्याचे संकेत मिळू लागले असतानाच शासनाने निर्यात शुल्क वाढवत शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरवले होते. आता कांद्याचे भाव वाढले असले तरी कांदा संपल्यात जमा झाल्याने या भाववाढीचा शेतकऱ्यांना जो लाभ व्हायला पाहिजे होता, तो आता फारच कमी शेतकऱ्यांना होणार आहे.
पाकिस्तानला भिती भरेल; बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार-मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
दरम्यान, शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्याने बाजार समितीत कांद्याची आवक पूर्णपणे घटलेली आहे. तसेच देशांतर्गत पुरवठा होत नसल्याने तिकडे मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात वाढ होते आहे. उन्हाळी कांदा संपून लाल कांद्याला बाजारात यायला अजून एक महिना अवकाश असल्याने भविष्यातही कांद्याचे दर हे चढेच राहणार आहेत. सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आलेले आहेत. कारण कांद्याच्या दरात वाढ होताना दिसते आहे. टोमॅटो सारखेच आता कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. सध्या राजधानी दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 50 ते 60 रुपये किलो आहेत तर आठवडाभरापूर्वी कांदा 30 ते 40 रुपये किलो भाव मिळत होता. आठवडाभरात कांद्याच्या दरात 50 टक्क्यांची वाढ झालेली आहे. एकीकडे पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत आणि दुसरीकडे मतदानापूर्वीच कांद्याच्या भावात तेजी आलेली आहे. यादरम्यान, डिसेंबरमध्ये नवीन पीक येण्यापूर्वी महागड्या कांद्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. पुढील काही दिवस कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम