Onion News | नाशिकच्या अनेक भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केलेली आहे. परंतु गेल्या पाच दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झालेला आहे. बेमोसमी पाऊस, ढगाळ वातावरण आणि पहाटे तसेच सकाळच्या सुमारास निर्माण होणाऱ्या धुक्यामुळे कांदा पीक धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.(Onion News)
Virat Kohli | आता T-20 आणि वनडे खेळणार नाही; वर्ल्डकपनंतर विराटचा मोठा निर्णय
तळेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झालेला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी मशागती करून कांदा लागवड केली आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बी- बियाणे, कांदा रोपे, खते, लागवड यावर मोठा खर्च केलेला आहे.
दोन-तीनदा झालेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि सकाळच्या सुमारास निर्माण होणारं धुकं यामुळे कांदा पिकावर मावा आणि करपा रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. (Onion News) वातावरणाचा फटका कांदा पिकास बसल्यास उत्पादनावर परिणाम होईल आणि आर्थिक गणित कोलमडणार असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आता चिंतेत आहेत. अचानक आलेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे कांदा पिकावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
Farmer Subsidy scheme | पिकांवरील कीडनियंत्रणासाठी आता मिळणार अनुदान
अवकाळी पाऊस, धुके, ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शिरूर तालुक्याच्या बेट भागातील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, काठापूर, जांबूत, फाकटे, चांडोह, टाकळी हाजी परिसरात तसेच वडनेर परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील कांदा पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले आहे. सध्या काही कांद्याचे पीक एक महिन्याचे होऊन गेले असून नवीन लागवडी सुरू आहेत. पण कांदा पिकासाठी पोषक थंडीचे वातावरण गायब होऊन अवकाळी पावसाने कांदा पिकाला चांगलेच झोडपून काढले आहे.(Onion News)
पावसाच्या उघडीपीनंतर ढगाळ वातावरण आणि सकाळच्या धुक्याचा कांदा पिकावर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होऊन पात वाकडी झालेली आहे. तसेच कांद्यावर करपा रोगाचाही प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधी फवारणी करावी लागते आहे. परिणामी, कांद्याच्या उत्पादन खर्चात भर पडणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. (Onion News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम