Onion News | कांद्याच्या दरात 60 टक्क्याहून अधिक वाढ झाल्याने केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शुक्रवारी (दि. २७) किरकोळ बाजारातील कांद्याची विक्री ‘बफर स्टॉक’मधून 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
Big news: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार….!; शिंदे राजीनामा देणार ?
ग्राहक व्यवहार मंत्रालय, नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल अग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून दोन लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणण्यात येणार आहे. हा कांदा 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने विकला जाणार आहे. देशभरात गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळते आहे. 14 ऑक्टोबरला लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 2,870 रुपये इतका भाव मिळालेला होता. पण गेल्या बारा दिवसांत आवक मंदावल्याने कांद्याच्या दरात 65 टक्क्याने वाढ होत 5860 रुपये इतका दर मिळाला आहे.
लवकरचं पुन्हा एकदा नोटबंदी होणार? …त्यामुळे पाचशे रुपयांच्या नोटा बदलुन घ्या!
त्यामुळे कांद्याच्या भाव नियंत्रणासाठी केंद्र सरकार सरसावलेले पहायला मिळत आहे. ‘बफर स्टॉक’मधून 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन खरीप कांदा अजून एक महिन्यांनंतर बाजारात येण्याची शक्यतादेखील आहे. डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर वाढतच राहण्याचीही शक्यता आहे. कांद्याला समाधानकारक भाव मिळतो असून, कांदा उत्पादकाला आनंद होता परंतु ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ बाजारात 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फटका बाजारभावावर होतो का? हे कांदा लिलावानंतर स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम