मंत्री पवारांचा पारदर्शक खरेदीचा दावा कांदा उत्पादक संघटनेने फेटाळला ; नाफेड कांदा खरेदीत होत असलेल्या भ्रष्टाचाराची पोल-खोल करू संघटनेचा इशारा

0
24

नाशिक प्रतिनिधी : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नाफेडची कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने होत असल्याचे सांगितले परंतु नाफेडची कांदा खरेदी खरोखरच पारदर्शक असती तर नाशिकसह महाराष्ट्रातील विविध कांदा उत्पादक जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या कांद्याचे खरेदी होत असल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसले असते संपूर्ण महाराष्ट्रात बाजार समित्यांचे मोठे जाळे असतांना केवळ पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव या दोनच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेडकडून थेट शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होत असून सदरची खरेदी ही अगदी मोजक्याच वाहनांमधून खरेदी होत आहे.

संपूर्ण देशातून अडीच लाख टन कांदा खरेदी पैकी महाराष्ट्रातून दोन ते सव्वा दोन लाख टन कांदा खरेदी करायची असतांनाही बाजार समितीत रोज केवळ 8 ते 10 वाहनांमधूनच नाफेडकडून कांदा खरेदी सुरू आहे उर्वरित कांदा खरेदी हा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या फेडरेशन मार्फत सुरू असून शेतकऱ्यांना कांद्याला 18 ते 20 रुपये उत्पादन खर्च येत असतांना नाफेडकडून मात्र सरसकट 9 ते 11 रुपयानने खरेदी सुरू आहे.

मोजक्याच फेडरेशनला नाफेडने कांदा खरेदी दिली आहे हीच बाब मुळात संशयास्पद असून संबंधित फेडरेशनचा कांदा खरेदीचा पूर्वानुभव तपासल्याचे मात्र यात दिसत नाही शेतकऱ्यांच्या हितापेक्षा नाफेडच्या यावर्षीच्या कांदा खरेदीच्या माध्यमातून ठराविक घटकांनाच जास्त फायदा पोहचेल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे नाफेडच्या संपूर्ण कांदा खरेदीच्या बाबतीत असंख्य शेतकऱ्यांनी संघटनेकडे तक्रारी केल्या असून नाफेडकडून पारदर्शकपणे कांदा खरेदी सुरू आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांचे म्हणणे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून फेटाळण्यात आले आणि नाफेडच्या संपूर्ण कांदा खरेदीवर महाराष्ट्र राज्य कांदा संघटनेचे बारकाईने लक्ष असून नाफेड कांदा खरेदीत होत असलेल्या भ्रष्टाचाराची पोल-खोल करू असा इशारा संघटनेचे भारत दिघोळे यांनी दिला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here