मोठी बातमी | लासलगाव बाजार समितीत आजपासून १२ दिवस कांद्याचे लिलाव राहणार बंद

0
31

मोठी बातमी | सणासुदीच्या तोंडावर कांदा दर वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टाॅक बाहेर काढलेला आहे. त्यामुळे मागील महिन्यात उन्हाळी कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल 5300 रुपये दर मिळत होता. त्यात 1800 रुपये प्रतिक्विंटलची घसरण झालेली आहे. लासलगाव बाजार समितीमधील कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून 12 दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Winter Update | दिवाळीत नाशिककर गारठणार! तापमानात होणार 2 अंशांनी घट

यंदा माॅन्सूनच्या पावसानं उशीर केल्याने खरीप कांद्याची उशीरा लागवड झाली. त्यातच पावसाच्या खंडामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने अद्यापही बाजारात नवीन कांद्याची आवक झालेली नाही. त्यामुळे उन्हाळी कांद्याचा चांगला दर मिळत होता. या कांद्याला सरासरी ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत होता. किरकोळ बाजारात हा कांदा 80 रुपये प्रतिकिलोच्यावर पोहोचला आहे. देशांतर्गत बाजार समितीमधील भाव नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी विरोध केलेला आहे.

त्यात सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांद्याची खरेदी सुरू केलेली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने बफर स्टाॅकमधून दोन लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणलेला आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात घसरण होते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 1800 रुपये प्रतिक्विंटलचे नुकसान होते आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे.

Crime News | पोलीस स्टेशनसमोर बंद गाडीत सापडला मृतदेह

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून दि. ७ ते दि. १८ नोव्हेंबर असे 12 दिवस बंद राहणार आहे. याबाबतचे पत्र लासलगाव मर्चंट असोसिएशने (Lasalgaon Merchants Association) बाजार समिती प्रशासनाला दिलेले आहे. लिलाव बंद असल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर होऊन कांदा कोंडी होण्याची शक्यता आहे.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here