कांदा उत्पादक रस्त्यावर ; देवळा येथे रास्तारोको, शेतकऱ्यांचा उद्रेक

0
15

देवळा: शेतकरी संकटात सापडला असून सद्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे. देवळा येथील पाच कंदिल चौकात कांदा भाव प्रश्नी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी तालुका अध्यक्ष माणिकराव निकम यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासन दरबारी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आज आंदोलन पुकारले आहे.

देवळा येथे शेतकरी संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार दिनेश शेलूकर व पो.नि. दिलिप लांडगे यांना देण्यात आलेल्या निवेदनात राज्य व केंद्र शासनाने कांदा निर्यात खुली करावी तसेच कांद्याला तीन हजार रुपये प्रिक्विंटल भाव द्यावा, रात्री जी वीज दिली जाते ती थांबवून दिवसा विज द्यावी, सिबील अट रद्द करावी, तसेच रासायनिक खतासोबत लिंकिंग बंद करुन मुबलक खत पुरवठा करावा, अतिवृष्टीतील पिकांच्या नुकसानिचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आजच्या या आंदोलनास कांदा उत्पादक संघटना , प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी कुबेर जाधव, जयदिप भदाणे, कृष्णा जाधव, राजू शिरसाठ, सुनिल पगार आदिंसह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here