केंद्र सरकारच्या निर्णयाची कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली होळी


देवळा: मेशी ता.देवळा येथे केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर 40 टक्के वाढीव शुल्क लागू केल्याबद्दल रविवारी दि २० रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ ,शिवसेनेचे (उबाठा) गटाचे तालुका प्रमुख बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या या धोरणाचा जाहिर निषेध करण्यात येऊन पत्रकाची होळी करण्यात आली. तसेच अत्यल्प प्रजन्यवृष्टी मूळे पाणी टंचाई निर्माण झाली असून पिके करपू लागली आहेत.

मेशी ता देवळा येथे केंद्र सरकारच्या कांदा निर्यात वाढीव शुल्काचा निर्णयाच्या पत्रकाची होळी करतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ ,शिवसेनेचे (उबाठा) गटाचे तालुका प्रमुख बापू जाधव आदींसह शेतकरी वर्ग (छाया – सोमनाथ जगताप )

यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने त्वरित संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळी जाहिर करावा अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.व केंद्र शासनाच्या या धोरणाविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ,स्वाभिमानी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार शिरसाठ,शिवसेना ठाकरे गटाचे देवळा तालुकाप्रमुख बापू जाधव, माजी सभापती केदा शिरसाठ,भिका बोरसे,मोतीराम शिरसाठ,शरद सूर्यवंशी,धनंजय शिरसाठ,समाधान चव्हाण, शरद चव्हाण, विश्वास जाधव ,विष्णू जाधव आदींसह ग्रामस्थ,कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!