Onian farmer : महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत आज अनेक ठिकाणी बाजार समित्या बंद पाडण्यात आल्यात. आपल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड संतापला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव मंडईतील लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे. शेतकऱ्यांना हल्क्यात घेवू नका अन्यथा महागात पडेल असा इशाराच शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.
Mumbai Police Alert: ‘सरफराज मेमन मुंबईत पोहोचला, चीन, पाकिस्तानमध्ये घेतली ट्रेनिंग’, NIA चा पोलिसांना इशारा
कांदा उत्पादक शेतकऱ्याने सांगितले की, आम्हाला आमच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, याच्या निषेधार्थ आम्ही बाजारात बोली लावणे बंद केले असून कृषी मंत्री तसेच पालकमंत्र्यांनी आमचे निवेदन स्वीकारावे अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला आहे. सरकारने आम्हाला अर्थसाह्य करावे कांदा उत्पादक संघटनेच्या म्हणण्यानुसार त्यांची किंमत सरासरी 30 रुपये किलो पर्यंत दर हवा. नाशिकमधील लासलगाव एपीएमसी येथील कांद्याच्या घाऊक किंमतीमुळे शेतकऱ्यांनी आज लिलाव होवू दिले नाही. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघानेही सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कांद्याच्या भावात वाढ करण्याची मागणी करत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेधही केला.
Gold Rate Today: सोने 3,600 रुपयांनी स्वस्त, बघा काय आहे किंमत
आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून एका शेतकऱ्याने सांगितले की, आम्हाला कांदा पिकवण्यासाठी एकरी 50,000 रुपये खर्च येतो, तर विक्री केलेल्या उत्पादनातून आम्हाला फक्त 10,000-20,000 रुपये मिळतात. आपण आत्महत्येचा विचार करत आहोत अशी स्थिती आली आहे. केंद्र सरकारने निर्यात धोरण बदलावे शेतकऱ्यांना अनुदान द्यावे जेणेकरून शेतकरी उभा राहील.
विशेष म्हणजे, यावर्षी केवळ महाराष्ट्रच नाही तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातही कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याची इतर राज्यांतील मागणी पूर्वीच्या तुलनेत आता कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. परिस्थिती अशी आहे की, शेतकऱ्यांना कुठे 1 रुपये तर कुठे 2 रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. जे खर्चापेक्षा खूपच कमी आहे. कांदा उत्पादक संघटनेच्या म्हणण्यानुसार त्यांची किंमत सरासरी २० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे सध्या कांद्याच्या उत्पादनात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी मंडईंमध्ये अधिक आवक होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम