द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (त्र्यंबकेश्वर) : नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात या अवैध मैद्य वाहतुकीवर कारवाई करण्यात येऊन जप्त मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या अंबोली चेक पोस्ट येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करताना विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. यात जवळपास 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दोघांना या कारवाईत अटक करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत बऱ्याच वेळा राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत, अवैध मद्य वाहतुकीला वेसन घातले आहे. मात्र आता पुन्हा तोच प्रकार समोर आल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत गुप्त माहिती मिळल्यानुसार सापळा रचून ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे.
राज्यात अवैध प्रकारांचा सुळसुळाट प्रचंड वाढलेला दिसुन येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आत्तापर्यंत भरपूर कारवाया करून अवैध मद्य वाहतुकीला आळा घालण्याच प्रयत्न केला आहे. मात्र तरी देखील असे प्रकार समोर येत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम