सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाशिक शहरासह जिल्ह्यातील व्यापारी आणि सभासदांच्या दृष्टीने महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या मल्टीशेड्युल्ड अशा ‘दि नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.’ (नामको) या बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, २१ जागांसाठी येत्या २४ डिसेंबरला ही मतदान प्रक्रिया होणार आहे.
या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडूनही पॅनलनिर्मितीसाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
भाजप उद्योग आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील देवरे यांनीही ही निवडणुक लढवावी असा सभासदांचा आग्रह होत असून, याबाबत आता ते काय निर्णय घेतात आणि कोणत्या पॅनलकडून उमेदवारी करतात याबाबत आता उत्सुकता आहे.
Good News | आता तुमच्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळणार घरबसल्या
देवळा तालुक्यातील उभरते नेतृत्व म्हणून व्यापारी सुनील देवरे यांच्याकडे पाहिले जात असून, उमराणे विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, उमराणे बाजार समितीचे संचालक यांच्यासह इतरही अनेक संस्थांवर प्रतिनिधित्व करताना विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
प्रसिद्ध कांदा व्यापारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. वाढता जनसंपर्क आणि काम करण्याची पद्धत यातून सभासदांच्या आग्रहाखातर त्यांची नामकोसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
Crime News | गर्लफ्रेंडशी भांडण झालं म्हणून पोलीसाने उचललं टोकाचं पाऊल!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम