द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक शहरातील कोरोनाकाळापासूनचे निर्बंध आता उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागातील निर्बंध तसेच राहणार आहेत. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली. याप्रकारची घोषणा येत्या दोन दिवसांत केली जाणार असल्याचे देखील ते म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अनेक प्रकारचे निर्बंध सुरू झाले होते. लग्न, दुकान, हॉटेल, जिम, स्पा, स्विमिंग पूल असे सर्वच प्रकारच्या आस्थापणांवर वेळ आणि उपस्थिती मर्यादेची बंधने होती. त्यानंतर कालांतराने आता हळूहळू निर्बंध कमी करण्यात आले होते. परंतु, बरेचसे निर्बंध अद्याप सुरू होते. मात्र आता कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव पाहता, सर्व बंधने आता उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागातील निर्बंध तसेच राहणार आहेत.
आता निर्बंध उठवण्याबाबत निर्णय घेतला जाणार जरी असला, तरी देखील नागरिकांनी आपापल्या परीने गाफील न राहता काळजी घेणे गरजेचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम