Niphad | धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागाच्या वतीने अंकाई किल्ला स्वच्छता व दुर्ग दर्शन मोहिम दि १३ मे व १४ मे २०२४ रोजी राबविण्यात आली होती. या मोहिमे दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच अंकाई किल्ल्याबद्दल दुर्ग सेवकांना माहिती देऊन गडकिल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
तसेच यावेळी स्वच्छता मोहीम राबवून गडावरील पाण्याचे टाके, आसपासचा परिसराची स्वच्छता करण्यात आली. लवकरच अंकाई या गडाचा कायापालट करण्यासाठी शिवसेवक कटिबद्ध राहतील. यावेळी उपाध्यक्ष अशोक झाडे, निफाड तालुकाध्यक्ष अभिजित महाले, केदार शिंदे, प्रसन्न जगताप, ओम जाधव, आकाश गांगुर्डे, कुणाल चव्हाण, ओम गंगुर्डे, शुभम ढोमसे, योगेश जाधव, मयुर सांगळे, सौरभ देवडे, कृष्णा जगताप व समस्त दुर्गसेवक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम