New Year 2024 | नव वर्षाची सुरुवात ‘अशी’ करा; २०२४ मध्ये होईल भरभराट

0
62
New Year 2024
New Year 2024

New Year 2024 |  अवघ्या सहा दिवसांत २०२३ हे वर्षाची समाप्ती आणि २०२४ ह्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. जुन्या सरत्या वर्षाला निरोप देत त्याच उत्साहाने नवीन आगामी वर्षाचे स्वागत केले जाते. दरम्यान, २०२४ ह्या नवीन वर्षाचा पहिला दिवस हा सोमवारचा दिवस असून, सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो.(New Year 2024)

सोमवार हा शंकराला समर्पित असून, ह्या दिवशी भगवान महादेवाची पुढीलप्रमाणे विशेष पूजा केल्याने आगामी वर्षात आपल्याला कधीही क्लेशदायी समस्यांना समोरे जावे लागणार नाही किंबहुना त्या समस्यांचा प्रभाव हा आपल्यावर कमी प्रमाणात होईल. तसेच, ह्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने आगामी वर्ष हे सुख-समृद्धी व भरभराटीचे जाईल.

हा उपाय केल्यास समृद्धी नांदेल 

पौराणिक कथांनुसार असं म्हटलं जातं की, देवांचे देव महादेव हे एकमेव देव आहेत जे अत्यंत दयाळू, कृपाळू असून, आणि ते भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. निस्सीम व प्रामाणिक भक्तांवर महादेव हे लवकर प्रसन्न होतात. महादेवाच्या पिंडीवर नियमित एक कलश जल अर्पण केल्याने भगवान शंकर हे प्रसन्न होतात आणि त्यांचे शुभ आशीर्वादांचा त्यांच्या भक्तांवर वर्षाव करत असतात. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून जर, नवीन वर्षाची सुरुवात केलीत तर तुम्हाला याचे उत्तम परिणाम हे आगामी वर्षात दिसतील. (New Year 2024)

Shani Shingnapur | शनि शिंगणापुरच्या ‘शनि’ मंदिरात नेमकं काय घडतंय..?

असा आहे शुभ मुहूर्त

१ जानेवारी २०२४ रोजी महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक केल्याने अभूतपूर्व फायदे होऊ शकतात. दरम्यान, ह्या जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त हा सकाळी ६.३३ पासून सुरू होऊन आणि सकाळी ७.५६ पर्यंत असणार आहे. योग्य वेळी भगवान शंकराला जल अर्पण केल्यास हा जलाभिषेक अधिक लाभदायक ठरेल. यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली आणि पवित्र होईल. जलासोबतच या दिवशी पिंडीवर बेलपत्रदेखील आवर्जून अर्पण नका. (New Year 2024)

या वस्तूही अर्पण करा|(New Year 2024)

भोळ्या महादेवाला बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच महादेवाला बेलपत्र अर्पण करायला करावे. भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने त्यांचे शुभ आशीर्वादांचा लाभ होतो. आणि यामुळे तुमच्या आयुष्याच्या पुढील नवीन वर्षातील समस्या ह्या दूर होतील आणि यासोबतच कोणत्याही पांढऱ्या रंगाची वस्तूदेखील ह्या दिवशी भगवान शंकराला अर्पण करावी. (New Year 2024)

Datta Jayanti | खर्डेत दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह जल्लोषात सुरू

अशी करा नव वर्षाची सुरुवात

नवीन वर्षाची सुरुवात ही दान-धर्म केल्याने आयुष्यात भरभराट येते. तुम्ही सोमवारी दही, पांढरे कपडे, साखर, दूध अशा भगवान शंकराला प्रिय असलेल्या वस्तु दान करू शकतात. तसेच हिवाळ्यात ह्या कडक्याच्या थंडीत पांढऱ्या रंगाचे उबदार कपडे देखील गोरगरिबांना दान करावे. या दिवशी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप केल्याने आध्यात्मिक ऊर्जा तसेच यामुळे शुभ फल प्राप्त होईल. सोबतच शिव चालिसाचे १०८ वेळा पठण केल्याने तुमच्यावर भगवान शंकराची विशेष कृपा होईल. (New Year 2024)

(टीप – वरील सर्व ‘द पॉइंट नाऊ’ हे माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कुठलाही दावा करत नाही.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here