Skip to content

राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळा तालुका अध्यक्षपदी जेष्ठ नेते पंडितराव निकम यांची नियुक्ती


देवळा ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट ) तालुका अध्यक्ष पदी विठेवाडी ता देवळा येथील जेष्ठ नेते पंडितराव निकम यांची नियुक्ती करण्यात आली .मुंबईत मंगळवारी दि २९ रोजी पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते निकम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .

मुंबई / राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळा तालुका अध्यक्ष पदी पंडितराव निकम यांना नियुक्ती पत्र देतांना प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील समवेत जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड , गजानन शेलार आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

राज्याच्या राजकारणात सद्या मोठ्या प्रमाणावर उलथापालथ सुरु असून, शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली आहे . यामुळे पधाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रावस्था पसरली आहे . यात निष्ठावंतानी आपापल्या पक्षासोबाबत राहणे पसंत केले असून , गटनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा धडाका सुरु झाला आहे . यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तालुका निहाय आपल्या गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नवीन नियुक्त्या तसेच ध्येय धोरणे ,पुढील वाटचालीसंदर्भात आढावा घेत आहेत .

आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती तसेच लोकसभा ,विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तींना महत्व प्राप्त झाले आहे. विठेवाडी ता देवळा येथील पंडितराव निकम हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत पाईक आहेत . पक्ष फुटीनंतर येवल्यात झालेल्या शरद पवार यांच्या सभेला त्यांची उपस्थिती होती . सुरुवातीपासून ते तालुका अध्यक्ष होते . मध्यंतरी माजी आमदार कै शांताराम तात्या आहेर यांनी बोलावलेल्या बैठकीत निकम यांनी आपली धुरा जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ यांच्या कडे सोपवली होती .

पक्षात नुकतीच फूट पडून अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले व तशा नियुक्त्या देखील करण्यात येत आहेत . त्यानुसार शरद पवार गटाकडून देवळा तालुका अध्यक्ष पदी पंडितराव निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून , निकम यांच्यावर पक्षाने पुन्हा जबाबदारी दिल्याने आगामी काळात पक्ष वाढीसाठी त्यांना सर्वाना सोबत घेऊन कामकाज करावे लागणार असून ,दुसऱ्या गटाला आपल्या सोबत घेण्यासाठी त्यांना कितपत यश येते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे .

निकम यांच्या निवडीचे पक्षाध्यक्ष शरद पवार ,प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील ,जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड , गजानन शेलार , जितेंद्र आव्हाड आदींसह बाजार समितीचे संचालक सतीश ठाकरे , नगरसेवक संतोष शिंदे , सचिन सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!