Nashik | जिल्ह्यातील पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर; नोव्हेंबरमध्येच ३४० गावांना टँकरने पाणीपुरवठा

0
42

Nashik | एकीकडे नाशिक जिल्ह्यात जायकवाडीला पाणी सोडण्याच्या मुद्यावरुन पेच निर्माण झालेला असताना जिल्ह्यात पाण्याची टंचाई असलेल्या 340 गाव आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. अत्यल्प झालेला पाऊस आणि धरणांमधील कमी साठा यामुळे नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवलेली आहे. सात तालुक्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यातच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली असल्याने दुष्काळी स्थितीचा अंदाज येतो आहे.

Bharat aata | मोदी सरकारची नवी भेट, सर्वसामान्यांसाठी ‘भारत आटा’ लॉन्च

सद्यस्थितीत 98 टँकरद्वारे 340 गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी स्थिती निर्माण झालेल्या नांदगाव तालुक्यातील 196 गावांचा समावेश आहे. यामुळेच नाशिकचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर आलेला दिसत आहे.

Educational | विद्यार्थ्यांना मिळणार अंडा पुलाव, बिर्याणी आणि केळी

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेल्या आदेशानुसार, जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचे आदेश दिलेले असल्याने त्याविरुद्ध सर्वपक्षीय आमदारांनी विरोध दर्शविलेला आहे. याप्रकरणी आमदार देवयानी फरांदे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत. कमी पाऊस झालेल्या बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर आणि येवला या तालुक्यांमधील 236 वाड्या आणि 104 गावे यामध्ये पाण्याचे टँकर्स ग्रामस्थांची तहान भागवत आहेत. नांदगाव तालुक्यातील सर्वाधिक 34 गावे आणि 162 वाड्यांचा समावेश आहे. येवला तालुक्यातही 35 गावे आणि 15 वाड्यांना पाण्याचे टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here