Nashik | शिंदे कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी गेले; अंधारेंची नाशकात तूफान बॅटिंग

0
30
Nashik
Nashik

Nashik | काल संध्याकाळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा ही काल नाशिकमध्ये आली असता, नाशिक ग्रामीणमध्ये काल (दि. १०) रोजी मनमाड येथे त्यांची सभा पार पडली. यावेळी सभेच्या आधी याठिकाणी काही नाट्यमय घडामोडी देखील झाल्या त्यावरून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे तसेच मंत्री दादाजी भुसे यांच्यासह स्थानिक शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी बोलताना अनेक वादग्रस्त मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तूफान फटकेबाजी केली.

सुहास कांदे यांनी बालिश चाळे केले 

काल मानमाड मध्ये सुषमा अंधारे ह्या सभेला जाण्याआधी शिंदे गटाच्या आमदार कांदे यांच्या समर्थकांनी सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना, “सुहास कांदे यांनी हा बालिश चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं असेल की यामुळे सुषमा अंधारे काम थांबवेल. पण हा त्यांचा भेदरटपणा आहे.त्यांचा हा बालिश प्रयत्न फार काही सफल झालेला नाहीये. ” अशा शब्दांत अंधारे यांनी आमदार कांदेंच्या विरोधात त्यांच्याच बालेकिल्ल्यातून तूफान बॅटिंग  केली.

“मनमाड मध्ये जे काही घडलं, ते दोनशे तीनशे रुपये देऊन बोलवलेले भाडोत्री लोकं होते. तो सगळा भाडोत्री कार्यक्रम होता. सुहास कांदेंना वाटलं की, आपण दादागिरी करू शकतो. पण त्यांनी ताईगिरी अजून बघितलेली नाही. ताईगिरी ही दादागिरी पेक्षा फार मोठी आहे. फक्त आम्ही उथळ होत नाही इतकंच” असे बोलत अंधारे यांनी झालेल्या प्रकारावरून कांदे समर्थकांना चांगलंच धारेवर धरलं.

Sanjay Raut | “संजय राऊत चुXX झालाय”; राज्यात पुन्हा शिव्यांचे राजकारण

पालकमंत्री म्हणून दादा सपशेल अपयशी

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी ज्या काही गोष्टी समोर आल्या आहेत, त्यानुसार हिंदू सकल समाज यांच्यातर्फे  मला निनावी पत्रही मिळाले. पण त्याला काहीही कायदेशीर आधार नसल्याने त्यातील नावे ही बाहेर येऊ शकली नाहीत. पण, ह्या पत्रात छोटी भाभी आणि बडी भाभी असा संदर्भ आलेला आहे. पण, त्याला कायद्याचा काहीही आधार आणि पुरावे त्या पत्रात नव्हते, म्हणून मी त्यावर फार काही बोलत नाही. मात्र, ललित पाटील प्रकरणी मी जे काही मुद्दे मांडले होते, त्यावर मी अजूनही ठाम आहे. याप्रकरणी, दादा भुसे यांना माझा प्रश्न कायम आहे.

साधे ब्युटी शॉप उघडण्यासाठीही इतक्या गोष्टी लागतात, मग एवढा मोठा ड्रग्ज कारखाना यांच्या कसा लक्षात आला नाही ? आणि जर हेच लक्षात आलं नाही, तर पालकमंत्री म्हणून तुम्ही सपशेल अपयशी ठरलेले आहात. आमच्या ठाकरे कुटुंबावर ज्यावेळी राणेंसारखे चिल्ले पिल्ले बोलतात, त्यावेळी आम्ही चिडतो का ? मग दादा भुसे यांनी चिडण्याचे कारणच काय ? माझ्यात बाळासाहेब ठाकरे यांचा एक गुण आहे. तो म्हणजे ‘एकदा माझा शब्द सुटला की, ती बंदुकीची गोळी’ असते. आणि त्यांची नार्को टेस्ट व्हावी, यावर मी अजूनही ठामच आहे.

असा कोणता आजार आहे, की त्याला त्याच्या निदानासाठी नऊ महिने दवाखान्यात ठेवले जाते. या प्रकरणावर सभागृहात चर्चा व्हायला हवी. या संपूर्ण प्रकरणात दोन पार्ट आहे. ललित पाटील हा मातोश्रीवर आला. हे खरं, पण मातोश्रीवर येण्यासाठी गेट पास असतो. त्याला मातोश्रीवर आणण्यासाठी दादा भुसे यांचाच रोल आहे.

Malegaon | हिरे कुटुंबीयांचे हात बरबटलेलेच; काळ्या करणाम्यांची मालिका सुरूच

पण सत्ताधारी चालाख

ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सभागृहात चर्चा व्हावी, म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण हे सत्ताधारी चलाख आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी ‘सांगा मलिक कुणाचे’, यावर चर्चा केली. ज्या दिवशी माझ्या हातात काही पक्के कागद असतील, तेव्हा मी पुन्हा याच नाशिकमध्ये येऊन सांगेल आणि तेही ‘डंके की चोट पर’ सांगेन. मी काय ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला’ असं करणाऱ्यातली नाहीये. आमच्या भाच्यांमध्ये (राणे बंधू) आणि माझ्यात फरक आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा हीच पालकमंत्री यांना रिपोर्ट करते.

एकनाथ शिंदे कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी का गेले ?

अवकाळी पाऊस झाल्यावर ठाकरे गटाचे आमचे सर्व नेते हे शेतकऱ्यांच्या बांधावर होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी तिकडे का गेले होते? तिकडे काय महाराष्ट्रातील शेतकरी राहत होते का ? अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना, मुख्यमंत्री हे इतर राज्यांमध्ये प्रचाराला गेले होते. त्यावर सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

ह्या दंगलीच्या घटनांमागे सरकारचा कट..? 

मराठा आरक्षण त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी वाद आणि धनगर समाजाचे सुरू असलेले आंदोलन आणि यामुळे राज्यात पसरलेली अशांतता यावर बोलताना अंधारे म्हटल्या की “उद्धव ठाकरे यांच्या काळात दंगल वगैरे असं काही घडलं नव्हतं. पण हे एकनाथ शिंदे आल्यावर हे सर्व ठरवून केलं जात आहे. त्यांच्या लक्षात आलं, की काहीही करून हिंदू मुस्लिम ह्या समाजांमध्ये दंगल होऊ शकत नाही. त्यामुळे मग त्यांनी ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू केला. पण आम्हीदेखील गावगाड्यातील लोक आहोत आम्ही गुण्यागोविंदानेच नांदतो. जर शिंदे आणि फडणवीस यांची नियत असेल, तर शिंदे, फडणवीस, पवार ह्या तिघांनी एकत्र बसावे आणि रिजोल्युशन पास करावे आणि संसदेकडे पाठवावे आणि त्यावर विशेष अधिवेशन घ्यावे, हे सगळं इतकं सोप्पं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here