Nashik crime नाशिक रोड येथे गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आल्याने नाशिक रोड परिसरात दहशतीचा वातावरण पसरल आहे
विहितगाव येथे दोन गुंडांनी हातात कोयते घेऊन रविवारी मध्यरात्री दहशत निर्माण करून चार दुचाकी गाड्यांसह एकूण १५ गाड्यांचे नुकसान केले होते. या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी काही तासातच दोघा संशयितांना अटक केली. दरम्यान ही घटना ताजी असताना २४ तास होत नाही तोपर्यंत येथील धोंगडे नगर परिसरातील राजलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या ठिकाणी इमारतीतील रहिवाशांनी आपल्या चारचाकी गाड्या पार्किंग करून ठेवल्या होत्या.त्यानंतर ही घटना स्थानिक नगरसेवक रमेश धोंगडे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते अतुल धोंगडे यांना समजताच त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने जमा झाले. यावेळी त्यांनी टोळक्याला अडविण्याचा प्रयत्न केला परंतु टोळके पसार होण्यात यशस्वी ठरले. यानंतर ही घटना उपनगर पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या टोळक्याचा सीसीटीव्ही फुटेजच्याद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला.
https://thepointnow.in/financial-help-announced-for-flood-victims/
दरम्यान, उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या तीन दिवसात तीन मोठ्या घटना घडल्या असून त्यामध्ये शनिवारी बोधले नगर परिसरात एका युवकाचा खून करण्यात आला तर रविवारी मध्यरात्री विहीतगाव येथे दोघां गुंडांनी गाड्यांची जाळपोळ केली. त्यानंतर आज (दि.२५ जुलै) रोजी मध्यरात्री धोंगडे नगर परिसरात हातात कोयते व तलवारी घेऊन गाड्यांच्या काचा फोडल्या. या तीनही घटनांमुळे नाशिकरोड हादरले असून गुंडगिरी केव्हा संपुष्टात येणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम