Nashik Political | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर नाशिकच्या चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ झाली असून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या केदा आहेर यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्याकडून चांदवड-देवळा विकास परिवर्तन आघाडीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलले असून आता यावर भाजपने कठोर भूमिका घेत महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात बंडखोरी करणारे नाफेडचे संचालक केदा आहेर व जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डेंवर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी पत्र जाहीर करत कारवाई करण्यात आली आहे.
केदा आहेर व आत्माराम कुंभार्डेंवर कारवाई
चांदवड मतदार संघातून केदा आहेर निवडणूक लपविण्यासाठी आग्रही असल्यामुळे आमदार राहुल आहेर यांनी आपल्या ऐवजी केदार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाकडे केली होती. परंतु भाजपच्या केंद्रीय मंडळाकडून डॉ. राहुल आहेर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. ज्यामुळे आहेर बंधूंमध्ये फूट पडली व केदा आहेरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला तसेच माजी सभापती डॉ. कुंभारडे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु नंतर त्यांनी अर्ज मागे घेत केदा आहेर यांना पाठिंबा जाहीर केला. ज्यामुळे आहेर यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच पक्षाने जिल्ह्यातील काही बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली. ज्यात चांदवड मधील बंडखोरांवरील कारवाई टाळल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर अखेर पक्षाने केला यांच्यासह डॉ. कुंभार्डेंवर निलंबनाची कारवाई केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम