Nashik | पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर आता नाशिकच्या वाहनांना सवलत नाही

0
45
Nashik
Nashik

Nashik |   नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा ह्या महामार्गावर असलेल्या पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील एमएच १५ आणि मालेगाव मधील एमएच ४१ या वाहनांना असलेली टोलची सवलत ही आता रद्द करण्यात आली असून, हा टोलनाका सरकारच्या ६० किलोमीटर अंतराची नियमावली डावलून विकसित केलेला असल्यामुळे पिंपालगाव बसवंत ह्या टोलनाक्यावर नाशिकमधील वाहनांना सवलत देण्यात आलेली होती.(Nashik)

दरम्यान, टोलमधील ही सवलत रद्द केल्यामुळे नाशिकचे वाहनधारक हे प्रचंड संतापले आहेत. मुंबई-आग्रा ह्या महामार्गावर नाशिकमधील घोटी, पिंपळगाव बसवंत आणि चांदवड असे एकूण तीन टोलनाके आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यातील पडघ्यानंतर जवळपास ६० किलोमीटर नंतर घोटी येथे टोल नाका आहे आणि त्यानंतर पुन्हा ६० किलोमीटरवर पिंपळगाव बसवंत येथे हा टोल नाका असून,  पुढे पुन्हा ३५ किलोमीटर अंतरावरच चांदवडचा टोल नाका आहे.

Seema Hiray | सिंहस्थाबाबत प्रशासन उदासीन; आ. हिरेंवर अधिकारी नाराज

त्यामुळे मुंबईकडून नाशिकपर्यंत केवळ हे दोनच टोल नाके असल्याने त्याची भर काढण्यासाठी पिंपळगाव बसवंत आणि चांदवड येथील टोलनाक्यावर वाढीव रक्कम आकारली जाते. नाशिककडून चांदवड, मनमाड,आणि मालेगाव येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनांना फक्त ६० किलोमीटर इतक्या अंतरासाठी ३८५ रुपये इतका टोल भरावा लागतो. आणि यात पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर ह्या चारचाकी वाहनांना २२० रुपये आणि चांदवडच्या टोल नाक्यावर १६५ रुपये इतका टोल घेतला जातो.(Nashik)

 नाशिक जिल्हयातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नोंद केलेल्या म्हणजे एम एच १५ आणि एम एच ४१ या वाहनांना पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर प्रत्येकी ४० रुपये इतका टोल आकारण्याची सवलत दिलेली होती. पण ही सवलत मात्र आता अचानकपणे रद्द करण्यात आलेली असून, यामुळे नाशिकमधील चारचाकी वाहनधारकांमध्ये संतापाची भावना आहे. पिंपळगाव येथील टोल नाक्यावर नाशिक मधील वाहनधारकांना देण्यात येणारी टोलमधील सवलत ही पुन्हा सुरू केली जावी, अशी मागणी संतप्त नाशिककरांकडून केली जात आहे.

Malegaon News | दादा भुसे यांना मालेगाव मनपा आयुक्त पदी प्रामाणिक अधिकारी नकोय का?

सोबतच, पिंपळगाव बसंवत टोल नाका येथील प्रशासनाच्या अरेरावी कारभाराला आळा घातला जावा. यासाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपळगाव बसंवत येथील टोल नाक्यावरील प्रशासनाच्या मनमानी कारभारावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांची यांची भेट घेतली. यावेळी याबाबत झालेल्या चर्चेत भाऊसाहेब साळुंखे यांनी वायक्तिकरित्या दखल घेत या प्रकरणात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.(Nashik)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here