Nashik News | शिवभक्तांची मांदियाळी; पं. प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण नाशिकमध्ये होणार

0
19

Nashik News | नाशिक येथे आंतरराष्ट्रीय महाशिवपुराण कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांची महाशिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या नियोजन संदर्भात शासकीय विश्रामगृह नाशिक येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा नाशिक शहरात प्रथमच होत आहे. यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असणार आहे.

Nashik News | प्रत्येक गावाला पाणी मिळालं नाही तर बघा; आ. डॉ. राहुल आहेरांचा अधिकाऱ्यांना इशारा

21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ही कथा नाशिक महसरुळ परिसरातील बोरगड या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिव महापुराण कथा विमोचनकर पंडित प्रदीप मिश्रा यांचा ‘प्रवचन सोहळा’ पूर्ण श्रध्देने, सुव्यवस्था राखून यशस्वी करणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. या सोहळ्यास भाविक भक्तांची अंदाजे पाचे ते सहा लाख पर्यंत उपस्थिती लागणार असल्याचा अंदाज असून या संदर्भात सुयोग्य नियोजनासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची व्यापक बैठक शासकीय विश्रामगृह नाशिक येथे पार पडली. यावेळी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील सर्व आखाड्यांचे महंत देखील उपस्थित होते.

Crime News | चहा-बिस्कीट न मिळाल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया सोडून निघून गेले

या कार्यक्रमा संदर्भात येत्या दोन दिवसात शिवमहापुराण कथेच्या नियोजनाबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि महानगर प्रमुख प्रविण तिदमे हे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी बोलून समित्या निश्चित करून कामाची जबाबदारी वाटून देण्यात येणार आहे. पंडित मिश्रा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथेला असंख्य भाविक उपस्थित राहतात. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता कथेसाठी जागा, भव्य मंडप आणि संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत करण्यात येणार आहे. यावेळी उद्योजक जितुभाई ठक्कर, निमाचे धनंजय बेळे, खा. हेमंत आप्पा गोडसे, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. दिलीप बनकर, आ. सरोज अहिरे, आ. हिरामण खोसकर अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, शाम साबळे, सुदाम ढेमसे, प्रकाश लोंढे, तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेत ज्या महाविद्यालयीन युवक युवतींना स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. त्यांनी आपले नाव, नंबर, कॉलेज नाव, पुढील क्रमांकावर पाठवावे असे आवाहन पालकमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आलेले आहे. संपर्क क्रमांक – 9422841211.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here