Nashik News | नाशिकमध्ये बबनराव घोलप यांनी ठाकरेंची साथ सोडली; ‘हे’आहे कारण..?

0
22
Nashik News
Nashik News

Nashik News |  सध्या नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. दरम्यान, आता नाशिकच्या राजकारणातून आणखी एक खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ ठोकला आहे. तर, बबनराव घोलप यांच्या या राजीनाम्यामुळे थकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

कारण बबनराव घोलप हे उत्तर महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे मोठे नेते असून, त्यांचा चांगला वठ आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून बबनराव घोलप हे पक्षात नाराज असून, ते पक्ष सोडणार असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, हा अंदाज खरा ठरला असून, अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र, आता यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. (Nashik News)

Bachchu Kadu | बच्चू कडुंनी बोलून दाखवली नाराजी, म्हणाले ‘भिकार** योजना..’

शिंदे गटात करणार प्रवेश..?

कालच माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि आज त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अहमदनगर दौऱ्यावर असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज नशिक दौरा आहे. स्वतः ठाकरे पितापुत्र नाशिकमध्ये असताना घोलप यांचा राजीनामा म्हणजे ठाकरे गटाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काल घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यानंतर ते त्यांची पुढील भूमिका ही येत्या दोन दिवसात सांगणार असल्याचे ते म्हटले होते.

BJP | जुन्या नेत्यांना डावलून नव्याने आलेल्यांना संधी; ‘हे’आहेत भाजपचे उमेदवार..?

Nashik News |  का होती नाराजी..?

शिवसेना उद्धव ठाकरे गटातून आपल्याला अचानक शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख या पदावरुन काढून अपमानित केले. पदावर असताना ज्यांना आपण निष्क्रीय पदाधिकारी म्हणून काढून टाकून त्याजागी नवीन पदाधिकारी नेमले होते. त्यांनादेखील बदलण्यात आले होते, हे कितपत योग्य आहे, असा सवाल बबनराव घोलप यांनी केली आहे. तसेच त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदावरून हकालपट्टी केल्यामुळे नाराजी बोलून दाखवली आहे. घोलप यांनी शिंदे यांच्याआधी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या चिरंजीव म्हणजेच माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.(Nashik News)

ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभेचा शब्द मिळाला असूनही माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी ही त्यांना दिली जाणार होती. या चर्चेमुळेही बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती. दरम्यान, बबनराव घोलप हे नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून तब्बल पाच वेळा आमदार राहिले आहेत तर, महायुती सरकारमध्ये ते मंत्रीपदावर होते. (Nashik News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here