Nashik | नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम सुरु करा; शिवसेनेची मागणी

0
16
Nashik
Nashik

नाशिक :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिसांना अंमली पदार्थ विरोधी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नाशिक शहरातदेखील एमडी ड्रग्ससारख्या अंमली पदार्थांची विक्री होत आहे. तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या संशयास्पद पान टपऱ्या, संशयास्पद कॅफे यांच्याविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबवून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अश्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या महानगर पदाधिकाऱ्यांनी नाशिक शहर पोलिसांना दिले.

या सदर निवेदनात म्हटले आहे की, ड्रग्स सारख्या अंमली पदार्थांच्या विळख्यात देशातील तरुण पिढी सापडत आहे. नाशिक शहरही त्याला अपवाद नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिसांना अंमली पदार्थ विरोधी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत एमडी तत्सम ड्रग्सचे अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. तरुण पिढीला देशोधडीला लावणाऱ्या या अंमली पदार्थांची विक्री, वितरण पब, पान टपऱ्या अश्या विविध ठिकाणी होत असल्याचे प्रकार देशभरात उघडकीस आले आहेत.

Nashik News | शिवसेना महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांच्या पाठपुराव्याला यश

त्यामुळे पोलीस आयुक्तालय हद्दीतील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरालगत असलेल्या अनधिकृत, संशयास्पद पान टपऱ्या, संशयास्पद कॅफे यांच्याविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबवून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिसांनी शहर ड्रग्स मुक्त करण्यासाठी विशेष परिश्रम घेण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रविण तिदमे, मा. नगरसेवक शामकुमार साबळे, भागवत आरोटे, दिगंबर मोगरे, जिल्हासंघटक योगेश म्हस्के, उपमहानगरप्रमुख सुधाकर जाधव, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, महानगरप्रमुख दिगंबर नांडे, कार्यालय प्रमुख शरद नामपुरकर, विध्यार्थींसेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ, नितीन चिडे, आकाश पवार, अमित मांडवे, आदी उपस्थित होते. हे निवेदन पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना दिले.

Nashik News | नाशिककरांनो सावधान..! डेंग्यूच्या रुग्णांची संख्या शंभरी पार; तर, स्वाईन फ्लूनेही डोके वर काढले


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here