Nashik | येथील बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारातील कांदा लिलाव दिवाळीच्या सुटीनंतर तब्बल 13 दिवसांनी मंगळवारी (दि. २१) सुरु होणार आहे. दिवाळी सुटीनंतर बाजारात उन्हाळी आणि लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढू शकणार आहे. अनेक मजूर गावी गेल्याने दिवाळी सुटीत बाजार बंद ठेवण्यात आलेला होता.
Spiritual news | ही आहे शनिदेवाला प्रिय राशी; असे करा शनिदेवाला प्रसन्न
नाशिक तालुक्यासह कसमादे पट्ट्यात शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांदा शिल्लक आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये मिळेल त्या भावात कांदा विक्री केली होती. बदललेल्या हवामानामुळे चाळीमध्ये कांदा सडल्याने शेतकऱ्यांनीअत्यंत कमी किमतीतदेखील मालाची विक्री केली होती. गेल्या महिन्यापासून कांद्याला चांगला भाव मिळतो आहे. दिवाळीपूर्वी मुंगसे बाजारात सलग आठ दिवस उन्हाळी आणि नवीन लाल कांद्याची लक्षणीय आवक होती.
मध्यम प्रतीचा कांदा मात्र दोन ते अडीच हजार क्विंटलने विकला जातो आहे. दिवाळी सुटीमध्ये बाजार बंद असताना शेतकऱ्यांनी नवीन लाल कांदा काढून ठेवलेला होता. उन्हाळी आणि नवीन लाल अशा दोन्ही कांद्यांची आवक वाढणार आहे. पहिल्याच दिवशी बाजारात २० हजार क्विंटलपेक्षा अधिक कांदा येण्याची शक्यता आहे. बाजार सुरु होत असल्याने मजुरांसह ट्रॅक्टर, पिकअप आदी वाहनचालकांना रोजगार मिळणार आहे.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे पावसाळी लाल कांद्याचे उत्पादन घटलेले आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांनी मका, बाजरी, कपाशी ही पिके अर्ध्यावर काढून टाकत कांदा लागवड केलेली आहे. जानेवारी-फेब्रुवारीत कांदा बाजारात येईल अशी शक्यता आहे. शेततळे आणि विहिरीच्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे. आगामी उन्हाळी कांदा लागवडीचे भवितव्य देखील पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असणार आहे.
काय सांगता! पुढच्या 23 दिवसात भारतात होणार 35 लाखांहून अधिक लग्न
बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता
कसमादे पट्ट्यात कांदा हे प्रमुख पीक झालेले आहे. कांदा काढणी, नवीन लागवड आदींसाठी मजुरांना पुरेसे काम मिळते आहे. या परिसरातील धरणांमधून सिंचनासाठी आवर्तन मिळाले तर उन्हाळी कांद्याची लागवड देखील वाढू शकणार आहे. यातून मजुरांचा भविष्यातील कामाचा प्रश्नही काही प्रमाणात सुटू शकतो. नाशिक तालुक्यासह कसमादे पट्ट्यात काही ठिकाणी विहिरींनी आत्ताच तळ गाठलेला आहे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनाच रब्बी हंगामात उन्हाळी कांद्याचे पीक घेणे शक्य होणार आहे. उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटल्यास आगामी काळात कांद्याचे बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम