Nashik news | नाशिक मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार..! सर्वपक्षीय नेत्यांचे आज रास्ता रोको

0
26

Nashik news |  मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणातून सोडण्याच्या मागणीसाठी आज मराठवाड्यात सर्वपक्षीय नेते हे एकत्र रस्त्यावर उतरणार आहेत.

नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणातून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झालेला असतांनाही नगर व नाशिकमधील पुढाऱ्यांनी हे पाणी रोखून ठेवले आहे. दरम्यान, हे पाणी लवकर सोडावे, यासाठी आज गोदावरी महामंडळ येथे सर्वपक्षीय नेते रास्ता रोको करणार आहेत.

मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीतर्फे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरात जनआंदोलन होणार आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यास विलंब करणाऱ्या शासना विरोधात मराठवाड्यामधील मंत्री, सर्वपक्षीय आजी-माजी आमदार, तसेच औद्योगिक संस्था, आणि पाणी वापर सहकारी संस्थांकडून हे आंदोलन आज केले जाणार आहे.

दरम्यान, या आंदोलनात केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे, आ. प्रशांत बंब, संजय शिरसाठ, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांसह अनेक आजी-माजी आमदार तथा मंत्री सहभागी होणार आहे. आज सकाळी ११ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयावर हा मोर्चा होणारआहे.

Gold-Silver Price | आनंदवार्ता..! सोनं झालं स्वस्त, पाहा आजचे दर

लोकप्रतिनिधी आक्रमक…

समन्यायी पाणीवाटप या तत्त्वानुसार नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात ८.६ टी.एम.सी. इतके पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी ३० ऑक्टोबरला घेतला होता. पण, निर्णय घेऊन २० दिवस उलटले असून, अजूनही पाणी सोडलेले नाही.

नगर व नाशिकमधील पुढाऱ्यांच्या दबावामुळे हा पाणी सोडले जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता मराठवाड्याच्या ह्क्क्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी व नेतेमंडळी आक्रमक झाली आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या या आंदोलनात सर्वपक्षीय नेते एकत्र येत पाणी सोडण्याची मागणी करणार आहे.

मराठवाड्यात परिस्थिती भयंकर

मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाला. त्यामुळे, अनेक जिल्ह्यांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणीपुरवठा होत आहे. विहिरी व बोरवेलचे पाणी हे आटले आहे. सोबतच अनेक प्रकल्पही कोरडेठाक पडले आहेत.

हिवाळ्यात अशा परिस्थितीमुळे पुढील काळात परिस्थिती ही अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर व नाशिकच्या धरणातून तातडीने पाणी सोडावे ही मागणी होत आहे.

१९८३ मध्ये भारताने WorldCup जिंकताच एक दिवसाची सुट्टी केली होती जाहीर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here