Nashik | नाशिक मनपा क्षेत्रातील “दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्क” हे रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकसित करण्याकरीता निधी उपलब्ध होऊन कार्यान्वित होण्याबाबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना पत्राद्वारे मागणी केलेली आहे. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावे पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या फाळके स्मारकाचा कायापालट होण्यास मोठी मदत होणार असून, यामुळे नाशिकच्या वैभवात भर पडणार आहे. २३ वर्षांपूर्वी महापालिकेकडून दादासाहेब फाळके ह्या स्मारकाची निर्मिती केली होती.
ह्या पत्रात मंत्री भुसे म्हणाले की, “चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्क” येथे रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. पर्यटकांना विविध सुविधा पुरविणे आणि पर्यटनास चालना देण्याच्या दृष्टीने दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्क येथे रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध द्यावा अशी विनंती मंत्री दादा भुसे यांनी पत्राद्वारे केली आहे.
Nashik | शिंदे कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी गेले; अंधारेंची नाशकात तूफान बॅटिंग
सदरच्या ठिकाणी नाशिक मनपा मार्फत उद्यान, संगीत कारंजा, ओपन थिएटर, संग्रहालय, जॉगींग ट्रैक इत्यादी विकसीत केलेले आहे. पण, सद्यस्थितीत सदर स्मारकास अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, सदर फाळके स्मारक व वॉटर पार्क येथे रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर नाशिक शहरातील नागरीकांना विविध सुविधा पुरविणे उदा. थिम पार्क करणे, सायन्स सेंटर उभारणे, वॉटर पार्क मधील नवीन उपकरणे बसविणे, अम्युझमेंट पार्क, अॅडव्हेंचर पार्क, तसेच फिल्म सिटी तयार करणे अशा प्रकारचे उपक्रम राबवल्यास या ठिकाणी प्रतिसाद वाढण्यास मोठी मदत होईल आणि पर्यटनासही चालना मिळेल. चित्रपट निर्मिती क्षेत्राचाही प्रतिसाद मिळू शकेल आणि नाशिकचा नावलौकीक वाढण्यास यामुळे मदत होणार आहे.
Sanjay Raut | “संजय राऊत चुXX झालाय”; राज्यात पुन्हा शिव्यांचे राजकारण
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक आणि वॉटर पार्क येथे रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकास होण्यास नागरीकांचा तसेच पर्यटकांचा प्रतिसाद वाढण्यास मोठी मदत होईल आणि पर्यटनास यामुळे मोठी चालना मिळेल. त्यामुळे नाशिक शहराच्या नावलौकीकात ही भर पडेल अशी भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’ च्या मार्फत विकसित करण्याच्या कामी अथवा मनपा मार्फत विकसित करण्याच्या कामी हा निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती मंत्री दादाजी भुसे यांनी केलेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम