Nashik Lok Sabha Result | नाशिकमध्ये परिवर्तनाचे वारे फिरले; गुलाल राजाभाऊ वाजेंचाच

0
16
Nashik Lok Sabha Result
Nashik Lok Sabha Result

Nashik Lok Sabha Result | नाशिक लोकसभा मतदार संघाचा निकाल हा पूर्णपणे एकतर्फी लागला असून, सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेले राजभाऊ वाजे यांनीच गुलाल उधळला आहे. राज्यातील काही हायव्हॉल्टेज लढतींमध्ये नाशिकच्या लढतीचाही समावेश होता. येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महराज हे रिंगणात होते. मात्र, सुरुवातीला तिरंगी वाटणारी ही लढत मतमोजणीदरम्यान मात्र पूर्णपणे एकतर्फी असल्याचे स्पष्ट झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत राजाभाऊ वाजे लाखांच्या लीडने आघाडीवर होते. त्यामुळे त्यांचा विजय हा जवळपास निश्चितच होता. आता केवळ विजयाच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. (Nashik Lok Sabha Result)

Jalgaon Lok Sabha Result | खान्देशमधून पहिला निकाल हाती; भाजपचे कमळ फुलले

Nashik Lok Sabha Result | गोडसेंचा हट्ट महायुतीला महागात पडला 

दरम्यान, अखेर या बहूप्रतिक्षित लढतीचा निकाल समोर आला असून, हेमंत गोडसेंचा हट्ट महायुतीला महागात पडल्याने महायुतीचा बालेकिल्ला असलेला नाशिकचा गड हातून निसटला आहे. नाशिकच्या जागेवर ठाकरे गटाची रणनीती यशस्वी ठरली असून, राजाभाऊ वाजे यांची निवड ही योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. पहिल्या फेरीपासून राजाभाऊ वाजे हे आघाडीवर होते. अखेर त्यांनी हेमंत गोडसे यांचा दारुण पराभव केला आहे. यामुळे हेमंत गोडसे यांची हॅटट्रिक हुकली आहे. (Nashik Lok Sabha Result)

Piyush Goyal | राज्यातील पहिला निकाल; ‘या’ जागेवर भाजपचे कमळ फुलले


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here