Nashik | नाशिक-मराठवाडा पाणी संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हं असून नाशिकहून जायकवाडी धरणाला सोडण्यात येणाऱ्या पाण्याला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. नाशिकमधे दुष्काळी परिस्थिती असताना पाणी सोडण्यात येऊ नये अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून पुढची तारीख मिळते की न्यायालय काही निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे मात्र शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहेत.
Nashik News | आ. सुहास कांदे त्यांच्याच सरकारला कोर्टात खेचणार..?
नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीसाठी 8. 603 TMC पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतलेला आहे. निर्णय झाल्यापासून नाशिकच्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शविलेला आहे. दुसरीकडे आता या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मुख्य न्यायमूर्तींपुढे याचिका सादर झाली असून मात्र तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार देण्यात आलेला आहे. पुढील आठवड्यात याचसंदर्भातील अन्य याचिकेसोबत सुनावणी घेण्याचे हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आलेले आहे.
एकीकडे नाशिक जिल्ह्यात काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असतांना नाशिककरांचा विचार न करता नाशिकच्या गंगापुर, दारणा धरण समूहातून 8.603 TMC पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने आदेश दिलेले आहेत. परंतु, या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून नाशिक आणि नगर भागातील लाभार्थ्यांवर या चुकीच्या निर्णयामुळे अन्याय होईल अशी भूमिका मांडली जाते आहे. यावर आमदार देवयानी फरांदे यांनी देखील पाणी सोडण्यास विरोध केला असून विशेष बाब म्हणून जायकवाडीच्या मृत साठयातून जायकवाडी धरणात 65 टक्के उपयुक्त पाणीसाठा होण्यासाठी 5.94 पाणीसाठा वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली. या पुर्वीचा अनुभव पाहता पाणी सोडल्यावर वहनतूट 40 ते 45 टक्के येणार आहे. त्यामुळे जायकवाडीत यातील किती पाणी पोहचू शकेल, असा सवालही आ. देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला आहे.
Gold Silver Rate | सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण…
शेतकरी आक्रमक, आंदोलनाची तयारी
जायकवाडी धरणाला पाणी सोडल्यास शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सय्यदपिंप्रीमधील शेतकऱ्यांनी आ. फरांदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. पाणीप्रश्नी तुमच्यासोबत असून वेळप्रसंगी रस्त्यावर आंदोलन करण्याचीही तयारी असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. केवळ विरोध न नोंदवता महामंडळाच्या पुराव्यानुसार पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. यामध्ये यंदाच्या वर्षी विशेष बाब म्हणून जायकवाडी धरणाच्या मृत साठ्यातुन जलाशयात 65 टक्के उपयुक्त पाणीसाठी होण्यासाठी 5.94 TMC पाणीसाठा वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीदेखील केली. मागील अनुभव पाहता पाणी सोडल्यावर वहनतुट 40 ते 45 टक्के येणार आहे. त्यामुळे जायकवाडीत यातील किती पाणी पोहचू शकेल? असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे. त्यानुसार नाशिमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
उद्या पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक पडणार पार ..
नाशिकमधील पाणी हे जायकवाडी धरणाला पाणी सोडू नये अशी मागणी आता नाशिककरांकडून केली जात आहे. याच मागणीवरून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेले दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे उद्या बैठक घेणार आहे. या बैठकीत काय उपाय निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम