Nashik : गेल्या काही दिवसांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी भाव मिळत होता. मात्र आताच्यास्थितीत टोमॅटो दहा रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.यात दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोर टोमॅटो रस्त्यावर फेकले गेले. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला आहे.
नाशिक जिल्ह्यात कांद्याबरोबरच टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या महिन्यात 200 रुपये किलो अशा चढ्या दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला आता कुणीही बाजारभाव देत नसल्याचे चित्र दिसतंय. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात टोमॅटोला किलोला 200 रुपये किलो भाव मिळत होता. सध्या प्रति जाळी 70 ते 100 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघणे कठिण झालेले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नाशिकच्या दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोर टोमॅटो रस्त्यावर फेकले आहेत.यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे नाशिक- कळवण रस्त्यावरील दिंडोरी बाजार समितीच्या आवारात काही काळ वाहतूक ठप्प झाल्याची पहायला मिळाली.
Maharashtra Rain | परतीच्या पावसामुळं देशातील काही राज्यांना बसणार फटका
नाशिकमधील शेतकऱ्यांसमोरील आस्मानी तसेच अनेक विविध संकटे थांबण्याच नाव घेत नसून तब्बल 13 दिवसानंतर कांद्याचे लिलाव सुरू झाल्याने कांद्या उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पण अशातच आता टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे मागील महिन्यातच टोमॅटोला चांगला दर मिळत असताना आज कवडीमोल दरात टोमॅटो विक्री केला जात आहे. तब्बल दहा रुपये किलो दराने किरकोळ बाजार विक्री सुरु असून प्रति जाळी 70 ते 100 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून दिंडोरी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत शासनाच्या धोरणांचा निषेध केला आहे.दोन दिवसांपासून ऊन वाढत असल्याने टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असल्याने भाव कोसळले असल्याचे पहायला मिळत आहे.
Mumbai | गोरेगावात इमारतीला भीषण आग; 3 मुलांसह सात जणांचा मृत्यू
द्राक्ष बागा तोडून टोमॅटोचे उत्पादन घेण्यात आले आहेत
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी द्राक्ष पीक घेत होते,पण मागील वर्षी द्राक्षाला भाव मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडून टोमॅटोचे उत्पादन घेतले. एकट्या दिंडोरी तालुक्यात सुमारे सात हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. टोमॅटोसाठी शेतकऱ्यांना एकरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. परंतु, उत्पन्न रुपयात मिळत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये राग पाहायला मिळत आहे. आता नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा माल बाजारात येत असल्याने अशातच दर कोसळले असून दहा रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकल्याचे समोर चित्र दिसत आहे.
टोमॅटोचे भाव गेल्या काही दिवसांपूर्वी उच्चांकी मिळत होते. पण आता टोमॅटो हा बाजारात दहा रुपये किलोने विकला जात आहे.यामुळे आमच्यासारख्या टोमॅटो शेतकऱ्यांची वाईट अवस्था झालेली आहे.जो टोमॅटो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 200 रुपये प्रतिकिलो विकला जात होता तोच टोमॅटो आज दहा रुपये किलोने विकला जातोय.त्यामुळे टोमॅटोच्या आजच्या भावांनी आम्हाला फारच अडचणीत आणलेलं आहे.- साहेबराव कोल्हे.(टोमॅटो उत्पादक)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम