Deola | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकित कर्ज वसुली संदर्भात देवळा येथे संयुक्त आढावा बैठक

0
19
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकित कर्ज वसुली संदर्भात तालुक्यातील विकास सोसायटीचे सचिव, अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच बँकचे अधिकारी, तालुका सहायक निबंधक यांच्या समवेत उमराणे ता.देवळा येथे गुरुवार (ता.२०) रोजी संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. थकित कर्ज वसुली संदर्भात बैठकीत यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवळ्याचे सहायक निबंधक अनिल देवकर हे होते. जिल्हा बँकेचे मुख्य प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, कार्यकारी संचालक अरविंद शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्जवसुली संदर्भात तालुक्यातील गावनिहाय सहकारी सोसायटीच्या थकित कर्जा संदर्भात वसुली अंमलबजावणीबाबत सचिव आणि चेअरमन व संचालक मंडळ यांच्यामार्फत प्रत्येक सोसायटीचा वैयक्तिक आढावा घेण्यात आला.

विशेषतः एक कोटीच्या वर थकित कर्जाच्या बाबतीत सचिव आणि संबंधित अध्यक्षांना धारेवर धरून येत्या दहा दिवसांत ठरवुन दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे डोळ्यात तेल घालून थकित कर्जाची वसुली करावी अशी तंबी बँकचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी दिली. बऱ्याचशा सोसायट्या या थकबाकीत (एनपीए) असल्याने प्रशासक तसेच बँकेचे वरिष्ठ अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी यांनी सचिव आणि चेअरमन तसेच संचालक मंडळ यांना जास्तीत जास्त वसूल कशी होईल याची जाणीव करून दिली. याप्रसंगी संचालक मंडळांमधून अनेक अध्यक्षांनी वसुलीबाबत येणाऱ्या अडचणी बाबतीत मंत मांडले. यात तिसगाव संस्थेचे देवा वाघ, मेशी संस्थेचे राजू शिरसाठ, प्रहार शेतकरी संघटनेचेचे कृष्णा जाधव, विठेवाडी संस्थेचे चेअरमन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव, उमराणे सोसायटी चेअरमण श्री.देवरे यांनी चर्चेत भाग घेतला.

Sparrow Day | चिऊताई चा चिवचिवाट पुन्हा जागृत करूया… रोज दाणा – पाणी देऊया…

विशेषतः तालुक्यातील व जिल्हा स्तरावरील टॉपर (व्हाइट कॉलर) थकबाकीदार यांच्या थकित कर्ज वसुली बाबतीत आपण काय कार्यवाही करणार आहात ? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी उपस्थित करून जबाबदार अधिकारी व तत्कालीन संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी केली असता प्रशासकांनी त्याबाबतीत आमचा अँक्शन प्लॅन तयार असल्याचे सांगितले. इतर तालुक्यातील बरेचसे थकबाकीदार हे कोटीच्या पुढे असून ते थकबाकीदार हे विविध नेत्यांचे नातेवाईक आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे ते थकबाकी भरत नाही परिणामी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची थकबाकी ही वाढत चाललेली आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष राज शिरसाट, क्रुष्णा जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक तोट्यात जाताना दिसत आहे. हिला वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून भरीव मदत मिळाल्याशिवाय नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक वाचणे अशक्य आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या थकबाकीदार सभासदांवर कार्यवाही करून १००/८५ सारखे प्रकरण करून जप्ती आणून वसुली केली पाहिजे. सर्वसाधारण शेतकऱ्यांना वेठीस धरून बँकेचे कुठलेही हित जोपासले जाणार नाही असा सूर या आढावा बैठकीत मांडण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक रत्नाकर हिरे देवळा तालुका विभागीय अधिकारी संजय कदम, सुभाष चव्हाण कैलास चंदन, विठेवाडीचे समाधान निकम, संजय निकम, कैलास कोकरे,जिभाउ बोरसे यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव व संचालक उपस्थित होते. चेअरमन कुबेर जाधव यांनी आभार मानले.

हजारो कोटीच्या थकित कर्जामुळे तोट्यात गेलेल्या जिल्हा बँकेला वाचविण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत, परंतु मागील दहा वर्षात जे पदाधिकारी निवडुन गेले. त्यांनी बँक वाचविण्यासाठी काय प्रयत्न केले. त्यांच्या अनागोंदी कारभारामुळे जिल्हा बँक डबघाईस आली. अशा व्हाइट कॉलर पुढांऱ्यावर आपण काय कार्यवाही करनार आहात?. त्यांच्यावर आदी १००/ १०५ ची कार्यवाही करावी मगच सर्वसामान्य अल्प भुधारक व छोट्या थकबाकीदार शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात यावी.

कुबेर जाधव (समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here