Nashik | झाकली मूठ सव्वा लाखाची, तोंड उघडायला लावू नको; राऊतांना मंत्री भूसेंचा इशारा

0
30
Nashik
Nashik

Nashik |  नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज सिन्नर येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना आणि नागरिकांना नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबोधित केले. बोलताना मंत्री दादाजी भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आज सकाळी संजय राऊत यांनी नाशिक महानगरपालिकेत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला असून, याचा फायदा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मर्जीतील बिल्डरांना झाल्याचे आरोप केले होते.

Nashik | नाहीतर महागात पडेल

यावरून “झाकली मूठ सव्वा लाखाची, जास्त तोंड उघडायला लावू नको. नाहीतर महागात पडेल, असा थेट इशाराच मंत्री दादाजी भुसे यांनी राऊत यांना दिलं आहे. तसेच “हा भगवा झंझावात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. जनतेच्या चेहऱ्यावर विजयाचा उत्साह दिसत असून, या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा नाशिक जिल्ह्यात मोठ्या मताधिक्याने फडकेल यात काही शंका नाही, या शब्दांत मंत्री भुसे यांनी हेमंत गोडसेंच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला.

Dadaji Bhuse | मंत्री भुसेंनी दिलेला शब्द पाळला; वनहक्क धारकांना १३३ शासकीय योजनांचा लाभ

विकासासाठी आपले सरकार नेहमीच अग्रेसर राहिले. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी पश्चिम वाहिन्या पूर्वेकडे वळविण्यासाठी आपण सर्व मिळून पाठपुरावा करू. समुद्राला वाया जाणारे हे पाणी आपल्या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न करू. आमदार माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी हिताची मांडलेली भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळात समृध्दी महामार्गावर ५० किमी अंतरावर क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम आखण्यात येत आहे. यात सिन्नरसाठी जे जे हवे आहे. त्यासाठी आपण नियोजन करू असे आश्वासनही यावेळी भुसे यांनी दिले.

देशाच्या प्रधानमंत्री पदी पुन्हा तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना बसवायचे आहे. यासाठी जाती पाती, सीमा यापलीकडे आपल्याला मतदान करायचे आहे. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले.

दरम्यान, सिन्नर येथील गोडसेंच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, आ. माणिकराव कोकाटे, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, विजय करंजकर, अजय बोरस्ते, प्रेरणा बलकवडे, जयंत आव्हाड महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Dada Bhuse | मंत्री भूसेंच्या प्रयत्नांना यश; राज्यातील यंत्रमागांना वीजदर सवलत


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here