Nashik Crime | नाशिक शहरात चोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी धात्रक फाटा परिसरात साडेतीन लाख तर सातपूर परीसरात पावणेचार लाख असा सुमारे सात लाखांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. याप्रकरणी म्हसरूळ व सातपूर पोलिसात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धात्रक फाटा परिसरात चोरट्यांचा तीन लाखांच्या ऐवजावर डल्ला
सचिन सुरेश सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार, धात्रक फाटा परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरला असून लग्न सोहळ्यासाठी सोनवणे आपल्या कुटुंबीयांसह दिनांक 24 नोव्हेंबर विक्रोळी, मुंबई येथे गेले असता, संधीचा फायदा उचलत चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दाराची जाळी तोडून बेडरूम मधील कपाटातील 60 हजारांची रोकड, दीड लाखांची सोन्याची पोत, 80 हजाराची अंगठी, 66 हजारांचे कानातील टॉप्स असा एकूण 3 लाख 58 हजार 211 रुपयांच्या ऐवजावर डल्ला टाकला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime | निवडणूक आयोगाकडून नाशकात मोठी कारवाई; नामांकित हॉटेलातून कोट्यावधींची रक्कम हस्तगत
सातपूर परिसरातही चोरट्यांचा सुळसुळाट
तर दुसरीकडे सातपूर परिसरात घरफोडीची दुसरी घटना घडली असून सकंठा वंशराज यादव यांच्या फिर्यादीनुसार, सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी यादव बाहेर गेले असता. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराची कडी व कुलूप तोडून आत प्रवेश करत, सुमारे 3 लाख 70 हजारांचे सोन्याचे दागिने व रोकडीवर हात साफ केला. या ऐवजात सोन्याच्या बांगड्या, सोन्याची नथ, सोन्याचा हार, कानातले टॉप्स, बुंदा, अंगठ्या, सोन्याची चैन, चांदीचे दागिने यांचा समावेश असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम