Nashik Crime | देवळालीत अज्ञातांनी व्यापाऱ्याला लुटले; 60 हजारांची रोकड लंपास

0
40
#image_title

Nashik Crime | नाशिक जिल्ह्यातील देवळाली तालुक्यात मुक्तिधाम येथील व्यापाऱ्याला भर रस्त्यात दोन अज्ञातांकडून लुटण्यात आल्याची घटना घडली. व्यापारी दुकान बंद करून घरी जात असताना विहीतगाव नदी फुलावर दुचाकीवरून आलेल्या दोन संशयतांकडून त्यांची लूटमार करण्यात आली असून 60 हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आता नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यापारी हरीश परसराम ललवाणी यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Nashik Crime | अवैध सावकारी करणारा सराईत फरार; दोन साथीदार अटकेत

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली घटना

ही घटना सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजी रात्री घडली असून ललवाणीयांनी दिवसभराची व्यवसायाची रक्कम, बँकेची कागदपत्रे भरून बॅग मोपेडच्या खालील हुकाला अडकवली होती. त्यानंतर ते दुकानात काम करणाऱ्या मुलीसह घराकडे निघाले असता रात्री साडेदहाच्या सुमारास विहितगाव नदीपुलावर असताना अर्धवट क्रमांक असलेला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची वाट अडवली व ‘आम्ही पोलीस आहोत…गाडीच्या डिक्कीत काय आहे? ते दाखवा’ असे म्हणत त्यांच्यासोबत हुज्जत घातली. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. संशयितांनी ललवाणी यांना धक्काबुक्की करत मोपेडला अडकवलेली पैशांची बॅग हिसकावून घेतली व दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी, नाशिक रोड पोलीस सात अज्ञात आणि विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार जितेंद्र माळी या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here