Nashik Crime | जेलरोड परिसरात काल रात्री 11 वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी स्थापन केलेल्या मित्र मंडळातील सदस्यांकडून काही कारणातून वाद झाल्याने तिथे उपस्थित असलेल्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने हवेत गोळीबार केल्याची घटना जेलरोड मॉडेल कॉलनीतील शिवशक्ती जलकुंभ गार्डन जवळ घडली आहे तर या प्रकरणातील चार पैकी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या वादातून घडली घटना
हा गोळीबार वैयक्तिक वादातून झाल्याचे तपासात समोर येत असून विशेष म्हणजे तक्रारदार व संशयित हे एकमेकांचे मित्र आहेत. नितीन राजेंद्र बर्वे, संतोष पिल्ले, त्याचा मित्र भागवत आणि एक अनोळखी व्यक्ती अशी संशयतांची नावे असून त्यातील नितीन बर्वे याला अटक करण्यात आली आहे. तर इतर संशयितांचा शोध सुरू आहे. सुयोग खंडेराव गुंजाळ यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संशय इथे ओळखले मित्र असून परिसरातील वसंत विहार मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची यावर्षी निवड झाली. दरम्यान, 22 तारखेला रात्री दहा वाजता गुंजाळ हे मॉडेल कॉलनीत गार्डन जवळ बसलेले असता त्यांना नितीन बर्वे यांचा फोन आला तेव्हा गुंजाळ यांनी “नवरात्रीची तयारी करीत असताना माझ्यावरच सगळी जबाबदारी असून कोणीच धावपळ करत नाहीये. तुम्ही इकडे तिकडे फिरताय” असे सांगितले. मात्र गुंजाळ याने “तुम्ही मग फिरत बसा. संतोष पिल्ले गेला उडत मला नाही करायची नवरात्र. अध्यक्ष पदही नको” असे म्हटले आणि त्यांच्यात वाद झाला. रात्री अकरा वाजता संशयित कारमधून आले आणि त्यांनी गुंजाळ यांची भेट घेऊन गार्डनमध्ये जाण्यासाठी कारमध्ये सांगितले बसायला सांगितले.
पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू
मात्र गुंजाळ यांनी नकार देत घर गाठले. यानंतर संशयित कारमधून गार्डन जवळ आले व त्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर याप्रकरणी गुंजाळ यांनी फिर्याद दाखल केली असून नाशिक रोड पोलीस या प्रकरणी संपूर्ण तपास आता करीत आआहे. तर सर्व संशयित मद्यधुंद अवस्थेत वाद घालत असताना हा गोळीबार झाला तर हा गोळीबार एअरगन मधून केल्याचा दावा काही संशयतांनी केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम